Pravin Gaikwad
Pravin Gaikwad 
महाराष्ट्र

Loksabha 2019 : प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसप्रवेश; पुण्यातून उमेदवारीचे संकेत 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि शेकापचे नेते प्रवीण गायकवाड यांनी आज (शनिवारी) मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. गायकवाड समर्थकांच्या पुण्यासाठी उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत. 

प्रवीण गायकवाड यांचा मुंबईमध्ये मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. पुणे लोकसभेसाठी कॉंग्रेसचा उमेदवार ठरत नसल्याचे पेच निर्माण झाला आहे. गायकवाड हे स्पर्धेत होते. मात्र, त्यांच्या नावाला स्थानिक निष्ठावंतांनी विरोध केल्याने गायकवाड यांनीच, मला आता कॉंग्रेसचे तिकीट नको, अशी भूमिका घेतली होती. दुसरीकडे अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिला कॉंग्रेसने पायघड्या घातल्या आणि उत्तर मुंबईची उमेदवारीही दिली. त्यावर गायकवाड यांनी टीका करत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची काँग्रेस अवहेलना करत असल्याचा टोला लगावला होता. यानंतर सोशल मीडियातही त्याचे पडसाद उमटले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते हे गायकवाडांना उमेदवारी न देऊन भाजपविरोधात लुटुपुटुची लढाई लढत असल्याचे मेसेज व्हायरल झाले. त्याची दखल दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली. 

याबाबत "सरकारनामा' फेसबुकवर संवाद साधताना गायकवाड यांनी आपण संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेससोबतच जाणार असल्याचे त्यांनी सांगितले; तसेच कोणत्याही परिस्थितीत भाजपचा मार्ग आपल्याला निषिद्ध असल्याचे स्पष्ट केले. मला कॉंग्रेसने संधी दिली तर हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकोर यांच्याप्रमाणे महाराष्ट्रात भाजपविरोधात वादळ निर्माण होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला होता. माझ्या प्रवेशाची पायवाट तयार झाल्यानंतर अनेक पुरोगामी मंडळी कॉंग्रेसकडे वळू शकतात, असाही दावा त्यांनी केला होता. 

या साऱ्या घडामोडींनंतर प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीतच प्रवेश झाल्याने गायकवाड यांचा पुन्हा उमेदवारीसाठी विचार होईल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT