president ramnath kovind 
महाराष्ट्र बातम्या

मुंबई - नव्या दरबार हॉलचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे चार दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते आज मुंबईत असून राजभवनात नव्या दरबार हॉलचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

मुंबई - राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे चार दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते आज मुंबईत असून राजभवनात नव्या दरबार हॉलचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. राजभवन येथील नवीन कोनशिलेचे अनावरण राष्ट्रपतीच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे उपस्थित आहेत.

राजभवान जुन्या दरबार हॉलच्या जागीच नवीन दरबार हॉल बांधण्यात आला आहे. जुन्या दरबार हॉलच्या तुलनेत नव्या हॉलमध्ये जास्त आसनक्षमता आहे. जुन्या हॉलची हेरिटेज वैशिष्ठ्ये अबाधित ठेवून सभागॉहाला बाल्कनी आणि गॅलरी उभारण्यात आली आहे. २०१९ मध्ये सुरु झालेलं काम डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण झालं आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सपत्निक गुरुवारी मुंबईत दाखल झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. आज नव्या दरबार हॉलचे उद्घाटन झाल्यानंतर उद्या शनिवारी राष्ट्रपती रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. आंबडवे इथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिरला ते भेट देणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT