राष्ट्रपतींची रायगड किल्ल्याला भेट Sakal
महाराष्ट्र बातम्या

राष्ट्रपतींची रायगड किल्ल्याला भेट : छत्रपतींना केले अभिवादन

राष्ट्रपती कोविंद म्हणाले, शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी (ता. ६) रायगड किल्ल्याला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. राष्ट्रपती कोविंद म्हणाले, शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. ही सदिच्छा भेट माझ्यासाठी एखाद्या तीर्थयात्रेसारखी आहे. शिवाजी महाराजांच्या समर्थ नेतृत्वाखाली, या संपूर्ण प्रदेशाच्या वैभवात वाढ झाली आणि देशभक्तीची भावना पुन्हा निर्माण झाली.

१९ व्या शतकातील ‘शिवराज-विजय’ या संस्कृत ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे अत्यंत प्रभावी वर्णन केल्याचा उल्लेख त्यांनी केला. देशातील जनतेला, विशेषतः युवा वर्गाला महाराजांच्या महान व्यक्तिमत्त्वाशी परिचित होता यावे. तसेच, महाराजांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य समजून घेता घेण्यासाठी या ग्रंथाचे विविध भाषांमध्ये भाषांतर करण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रपती कोविंद म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी भविष्यकाळाचा वेध घेणारी होती. महाराजांनी त्यांच्या ‘अष्टप्रधान’ नामक मंत्रिमंडळाच्या मदतीने दूरदर्शी परिणाम साधणारे अनेक निर्णय घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतातील पहिल्या आधुनिक नौदलाची उभारणी केली, याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT