solapur PM modi sabha solapur loksabha
महाराष्ट्र बातम्या

पंतप्रधानांची सोमवारी सोलापुरात सभा! सभेला होम मैदान देण्यापूर्वी महापालिकेने तपासले 14 वर्षांचे रेकॉर्ड; भाजपने दीड लाखाचे भाडे अन्‌ एक लाखाचे डिपॉझिट भरले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी महापालिकेकडे होम मैदानाची मागणी केली. त्यावेळी पेचात पडलेल्या महापालिका अधिकाऱ्यांनी २०१० पासूनचे दोन पोत्यातील जुने रेकॉर्ड सलग पाच दिवस रात्रंदिवस पडताळले. त्यावेळी २०१५-१६ मध्ये हे मैदान कृषी प्रदर्शनासाठी दिल्याचा कागद सापडला.

तात्या लांडगे

सोलापूर : स्मार्ट सिटीअंतर्गत विकसित झालेल्या होम मैदानावर सहा वर्षांपासून एकही मोठा कार्यक्रम झाला नाही. २०१९ मध्ये लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यावेळी मैदानावर कामे सुरु असल्याने मैदान कोणीच मागितले नाही. २०१६ मध्ये महापालिकेने ठराव करीत हे मैदान व्हीव्हीआयपींच्या सभेसाठी किंवा मोठ्या राज्यस्तरीय प्रदर्शन, कार्यक्रमासाठी देण्याचा निर्णय घेतला होता. भाजपने याचाच आधार घेत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या होम मैदानाची सर्वप्रथम मागणी केली. पण, परवानगी देण्यापूर्वी महापालिका अधिकाऱ्यांना २०१० पासूनचे रेकॉर्ड तपासावे लागले.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच महापालिकेने नेत्यांच्या मोठ्या प्रचारसभांसाठी कोणकोणती मैदाने भाड्याने देता येतील, याची यादी तयार केली. त्यात जुनी मिल कंपाऊंडजवळील एक्झिबिशन ग्राउंड, पुंजाल मैदान, कर्णिक नगर, सावरकर मैदान, हुडको क्र. तीन क्रीडांगण, दाजी पेठ क्रीडांगण, संभाजी तलावालगतचे मैदान, परिवहन बस डेपो परिसर, जय भवानी प्रशालेचे मैदान व अल्ली महाराज मैदानाचा समावेश होता. त्यात होम मैदानाचे नाव नव्हते. तरीपण, भाजपच्या प्रचारसभेसाठी महापालिकेने त्यांना स्मार्ट सिटीतून विकसित झालेले मैदान दिलेच कसे, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता त्याठिकाणी जाहीर सभा होणार आहे. हे मैदान भाजपला देण्यामागील खरे कारण आता समोर आले आहे.

आठ पोत्यांमधील रेकॉर्डची ५ दिवस रात्रंदिवस पडताळणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी महापालिकेकडे होम मैदानाची मागणी केली. त्यावेळी पेचात पडलेल्या महापालिका अधिकाऱ्यांनी २०१० पासूनचे दोन पोत्यातील जुने रेकॉर्ड सलग पाच दिवस रात्रंदिवस पडताळले. त्यावेळी २०१५-१६ मध्ये हे मैदान कृषी प्रदर्शनासाठी दिल्याचा कागद सापडला. त्यानंतर २०१६ मध्ये महापालिकेने केलेल्या ठरावानुसार व्हीव्हीआयपी नेत्यांच्या सभांना व मोठ्या प्रदर्शनासाठी होम मैदान भाड्याने देण्याचा अधिकार महापालिकेने स्वत:कडे राखून ठेवल्याची माहिती देखील समोर आली. त्याचा आधार घेत महापालिकेने भाजपला हे मैदान सभेसाठी दिले आहे.

ठळक बाबी...

  • २०१५-१६ नंतर होम मैदान कोणालाही भाड्याने दिले नव्हते

  • २०१८मध्ये स्मार्ट सिटी स्थापन, २०१९पासून कामाला सुरवात झाली होती

  • २०१९च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काम सुरु असल्याने मैदान कोणीही मागितले नाही

  • पंतप्रधानांच्या सुरक्षिततेसाठी होम मैदान सुरक्षित; ‘एसपीजी’चाही तसाच अहवाल

  • मैदान भाड्याने द्यायचे नाही असा महापालिकेचा ठराव नाही; मैदानाला दिवसाला दीड लाखांचे भाडे तर एक लाखांचे डिपॉझिट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPचा दिल्लीत एल्गार! अभिजीत दीपकेंच्या पक्षाकडून ५ सप्टेंबरला मोर्चाची घोषणा; काय आहेत मागण्या?

NEET PG Admit Card 2026: ३० ऑगस्टला होणार नीट पीजी परीक्षा; डायरेक्ट लिंकवरून 'असे' डाऊनलोड करा हॉल तिकीट...

भारत-पाकिस्तान सीमेवर ‘तारिणी’चं शूटिंग! बॉर्डरवर शूटिंग करणारी ‘तारिणी’ ठरली पहिली मराठी मालिका!

Marathi News Live Updates : E20 इंधनाच्या मुद्द्यावर लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा यासाठी आम्ही आज एक व्हॉट्सॲप क्रमांक जारी करत आहोत - केजरीवाल

Palghar Ashramshala: गडचिराेलीनंतर पालघरच्या आश्रमशाळेत धक्कादायक घटना; ७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, १९ जणांना ताप

SCROLL FOR NEXT