CJP Delhi Protest on September 5
esakal
कॉकरोच जनता पार्टीने केंद्र सरकारविरोधात पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. सीजेपीकडून ५ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार आहे. इंडिया गेटपासून सुरू होणारा हा मोर्चा नवी दिल्ली पोलिस मुख्यालयाच्या दिशेने जाणार असल्याचं पक्षाने जाहीर केलं आहे. या आंदोलनात देशभरातील विद्यार्थी, तरुण, युवा संघटना आणि नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, NEET परीक्षेशी संबंधित प्रकरणांमध्ये जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांचे कुटुंबीय आणि पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचा सामना केलेल्या तरुणांचे कुटुंबीय या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत.