Prithviraj Chavan ekanth shinde  sakal
महाराष्ट्र बातम्या

Prithviraj Chavan: माझी लाडकी बहीण योजनेवरुन पृथ्वीराज चव्हाण कडाडले, वाचा काय म्हणाले माजी मुख्यमंत्री

Majhi Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेतील ६० ची वयाची अट काढून ६५ वर्षे केल्याची जाहीर केले.

हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

karhad Latest Update: अर्थसंकल्पात राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेची नोंदणीची अंतिम मुदत १५ जुलै आहे. नोंदणीला कोणतीही मुदत ठेवु नये, महिलांची वयोमर्यादा ६० वर्षावरील महिलांसह अविवाहित महिलांनाही लाभ मिळावा आणि ही योजना निवडणुकीची घोषणा न राहता याचा कायदा केला जावा अशा मागण्या माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केल्या.

त्यावर सरकारच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेतील ६० ची वयाची अट काढून ६५ वर्षे केल्याची जाहीर केले.

आमदार चव्हाण म्हणाले, लाडकी बहिण योजनेच्या १५ जुलै अंतिम नोंदणीच्या तारखेमुळे राज्यात नोंदणी केंद्राबाहेर मोठी गर्दी होत आहे. राज्यात काही भागात उन्हाची तीव्रता अजून असल्याने काही महिलांना भोवळ आल्याची घटना घडल्या आहेत. काही भागात पावसातही रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रात पंढरपूरची वारी सुरु आहे.

आषाढी एकादशी १७ जुलैला आहे. या वारीत जवळपास १० लाख वारकरी सहभागी होतात. या वारीत निम्याहुन अधिक महिला भाविक असतात. अशावेळी या योजेनच्या नोंदणीसाठी भाविक महिलांनी वारी सोडून यायचे का ? त्यामुळे या योजनेला तारखेचे बंधन नसावे. प्रत्येक महिलेला तिचा अधिकार मिळालाच पाहिजे. ही योजना फक्त निवडणुकीपुरती सुरु करायची व त्यानंतर बंद करायची हे योग्य होणार नाही.

केंद्रातील युपीए सरकारने ज्याप्रमाणे अधिकारावर आधारित कायदे केले होते, त्याप्रमाणे या योजनेचाही कायदा करावा. या योजनेत २१ वर्षावरील अविवाहित महिलांना वगळले आहे, त्यांचा काय दोष आहे ? त्यांना या योजनेचा फायदा मिळालाच पाहिजे. त्याचबरोबर ६० वर्षावरील सर्व महिलांना ज्यांना कोणी सांभाळणारे नसतील तर अशा वयोवृध्द महिलांना या योजेतून वगळणे योग्य नाही. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी वयोमर्यादा ६५ वर्षे केल्याची जाहीर केले.

..........................

केंद्राबाहेर एजंटाचा सुळसुळाट

लाडकी बहीण योजनेमुळे नोंदणी केंद्राबाहेर एजंटचा सुळसुळाट झाला आहे. महिलांना उत्पानांचा दाखला काढण्यासाठी ७००-८०० रुपये मागितले जात आहेत असा आरोप करुन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा तुटवडा झालेला आहे. या त्रुटी शासनाने लवकरात लवकर दूर केल्या पाहिजेत अशी मागणीही केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT