Prithviraj Chavan Sakal
महाराष्ट्र बातम्या

Prithviraj Chavan : इंडिया आघाडीतील जागा वाटपाबाबत पृथ्वीराज चव्हाणांचं स्पष्टीकरण; म्हणाले...

संतोष कानडे

कोल्हापूरः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा पूर्ण केला आहे. या दौऱ्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीतील जागावाटपाबाबत भाष्य केलं.

विरोधी पक्षांच्या नेत्यांची पहिली बैठक पाटणा व दुसरी बैठक बंगळुरूमध्ये पार पडल्यानंतर आता विरोधी आघाडीची पुढची बैठक मुंबईत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. विरोधी पक्षांची ही बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी 26 पक्षांनी मिळून इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. आघाडीमध्ये आणखी पक्षांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा केला. या दौऱ्यामध्ये आपल्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यामध्ये मला उत्साहाचं वातावण दिसलं. २०२४ची निवडणूक देशहितासाठी महत्त्वाची असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

पुढे बोलतांना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, इंडिया आघाडीतील जागावाटपाचा निर्णय बैठकीनंतर होणार आहे. पुढची लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. देशाच्या लोकशाहीसाठी आणि संविधान अस्तित्वात राहणार की नाही, यासाठी या निवडणुकीचं महत्त्व जास्त असल्याचं ते म्हणाले.

''केंद्र सरकारने देशातील सगळ्या संस्था ताब्यात घेऊन वेगळं चित्र निर्माण केलं आहे. जे रशिया आणि चीनमध्ये झालं तेच करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे'' असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT