Silica-Supported Iron Oxide cheaper alternative to hydrogenation pune
Silica-Supported Iron Oxide cheaper alternative to hydrogenation pune sakal
महाराष्ट्र

हायड्रोजनेशनसाठी आता स्वस्त पर्याय

सम्राट कदम

पुणे : औषधे, रंग, कृषी रसायने आदींमध्ये हायड्रोजनेशन प्रक्रियेसाठी महागड्या उत्प्रेरकांचा वापर करावा लागतो. याला पर्याय म्हणून ‘लोहा’वर आधारित स्वस्त आणि पर्यावरणपुरक उत्प्रेरक विकसित करण्यात शास्रज्ञांना यश आले आहे. महाराष्ट्रासह जर्मनी आणि चेक प्रजासत्ताकाच्या शास्रज्ञांचे हे संशोधन ‘नेचर कॅटॅलिसीस’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे.

जर्मनीतील लेबनिझ इन्स्टिट्यूट ऑफ कॅटॅलिस्टचे डॉ. विश्‍वास चंद्रशेखर, डॉ. थिरुसंगमुरुगन सेंथामराय, चेक रिपब्लिकचे डॉ. रविशंकर कदम, रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या मराठवाडा केंद्राचे डॉ. मनोज गावंडे, डॉ. ओंडरेज मालिना, डॉ. जोसेफ कास्लिक, डॉ. राडेक झबोरील, डॉ. राजेनहल्ली व्ही. जगदीश आणि डॉ. मॅथियास बेलर यांचा संशोधनात सहभाग आहे.

‘सिलिका सपोर्टेड आयर्न ऑक्साईड’चे नॅनो पार्टिकल उत्प्रेरक म्हणून विकसित केले आहे. त्याद्वारे ॲल्युमिनिअम ॲडिटीव्हच्या सानिध्यात नायट्रील संयुगांचे हायड्रोजनेशन सहज करता येते. डॉ. गावंडे म्हणाले, ‘‘आम्ही अमाईनच्या हायड्रोजनेशन प्रक्रियेचा सखोल अभ्यास केला. विविध प्रकारच्या अमाईन्सचा वापर औषधांच्या निर्मितीमध्ये खूप महत्त्वाचा आहे. याचबरोबर रंग, प्लॅस्टिक, जंतुनाशके व कृषी रसायनांच्या निर्मितीमध्ये अमाईन महत्त्वाची भूमिका बजावतात. नवीन हायड्रोजनेशन उत्प्रेरक विकसित करताना आम्ही आयर्न व सिलिका या घटकांचा विचार केला. ते मुबलक आणि कमी किंमतीत उपलब्ध आहेत.’’

हायड्रोजनेशन म्हणजे काय?

ही एक प्रकाराची रासायनिक अभिक्रिया असून, यात रसायनांमध्ये हायड्रोजन मिसळण्यात येतो. आजवर निकेल, पॅलॅडीयम, प्लॅटीनीयम या दुर्मिळ आणि महागड्या मुलद्रव्यांच्या सानिध्यात ही अभिक्रिया व्हायची. आता या नव्या उत्प्रेरकामुळे एक स्वस्त पर्याय उपलब्ध झाला आहे.

लोह आधारीत उत्प्रेरकाचे वैशिष्ट्ये

  • सिलिकॉन नॅनोपार्टीकलवर आयर्न ऑक्साईडची वाढ करण्यात येते

  • तयार झालेले नॅनोपार्टीकल रासायनिक आणि भौतिकदृष्ट्या स्थिर

  • काही ‘ग्रॅम’ उत्प्रेरकांची निर्मिती करण्यात यश

  • ॲरोमॅटीक, हेट्रोसायकलीक, फॅटी नायट्रील्स या रसायनांच्या हायड्रोजनेशन सहजतेने

उत्प्रेरकाचे फायदे

  • स्वस्त, पुनर्वापर आणि पर्यावरणपुरक

  • तयार करण्याची प्रक्रिया सोपी आणि सरळ

  • औद्योगिक पातळीवर उत्पादन सहज शक्य

  • स्वदेशी आणि परिपूर्ण पर्याय उपलब्ध

  • स्वस्त उत्प्रेरकामुळे आधारित उत्पादनांच्या किमती कमी होतील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT