शिक्षक भरती Google
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! प्राध्यापक भरती आता ६०:२०:२० च्या निकषांनुसार; तिसऱ्यांदा बदलले निकष; अर्जदार उमेदवारांना पुन्हा करावा लागणार अर्जात बदल, वाचा...

विद्यापीठातील प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदभरतीचे निकष आता तिसऱ्यांदा बदलले आहेत. नव्या निकषांनुसार ६० गुण शैक्षणिक पात्रतेसाठी, २० गुण मुलाखतीसाठी आणि उर्वरित २० गुण उमेदवाराच्या अध्यापनातील अनुभव, संशोधन व अन्य शैक्षणिक कौशल्यांसाठी असणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : विद्यापीठातील प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदभरतीचे निकष आता तिसऱ्यांदा बदलले आहेत. नव्या निकषांनुसार ६० गुण शैक्षणिक पात्रतेसाठी, २० गुण मुलाखतीसाठी आणि उर्वरित २० गुण उमेदवाराच्या अध्यापनातील अनुभव, संशोधन व अन्य शैक्षणिक कौशल्यांसाठी असणार आहेत. एका वर्षात तीनवेळा निकष बदलल्याने उमेदवारांना आता पुन्हा तिसऱ्यांदा अर्जात बदल करून द्यावा लागणार आहे. दुसरीकडे विद्यापीठ स्तरावरही अर्जांची छाननी नव्याने होईल.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबईसह बहुतेक विद्यापीठांमध्ये सद्यःस्थितीत विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी कंत्राटी तसेच तासिका तत्त्वावर शिक्षक घेतले आहेत. कारण मागील चार-पाच वर्षांत प्राध्यापक भरतीच झालेली नाही. आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन भरतीसंदर्भात पाठपुरावा केला.

वित्त विभागाच्या मान्यतेने राज्यातील अकृषिक विद्यापीठांमध्ये पाच हजार १२ प्राध्यापकांची भरती केली जात आहे. त्यात सोलापूर विद्यापीठातील सुमारे १० ते १२ पदांचा समावेश आहे. यासाठी विद्यापीठाने १०-१२ महिन्यांपूर्वी पहिल्यांदा अर्ज मागविले. त्यानंतर निकष बदल झाल्याने पुन्हा नव्याने अर्ज घेण्यात आले. अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांच्या याद्याही प्रसिद्ध झाल्या. आता भरतीचे निकष पुन्हा बदलले असून सर्व प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागणार आहे.

नव्याने अर्ज करावे लागणार नाहीत

प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक भरतीसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ११ फेब्रुवारीला नवीन शासन निर्णय काढला आहे. त्यानुसार आता पदभरतीची प्रक्रिया राबविली जाईल. यापूर्वी विविध पदांसाठी उमेदवारांनी विद्यापीठाकडे अर्ज केले असून नवीन निकषांनुसार संबंधित उमेदवारांना त्यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव, विविध कौशल्य याची थोडक्यात माहिती अर्जासोबत जोडावी लागेल. त्यांना नव्याने अर्ज करावा लागणार नाही. त्यासंदर्भातील माहिती दोन-तीन दिवसांत उमेदवारांना कळविली जाईल.

- डॉ. अतुल लकडे, कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

नव्या निकषांनुसार गुणदान असे...

  • शैक्षणिक पात्रता (एकूण शिक्षण, पदवी-पदव्युत्तर पदवीची टक्केवारी, पीएच.डी., ॲवॉर्ड, एम.फिल., जेआरएफ, नेट, सेट असे) : ६० गुण

  • शैक्षणिक कौशल्य (अध्यापनाचा अनुभव, संशोधन असे) : २० गुण

  • मुलाखत (आत्मविश्वास, वक्तृत्व, विविध विषयांमधील ज्ञान याची पडताळणी) : २० गुण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Jayanti 2026 Wishes: शौर्य, निष्ठा आणि प्रजाहितक्षम नेतृत्व! छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अशा द्या मराठी शुभेच्छा अन् संदेश

Healthy Breakfast Recipe: सकाळचा हेल्दी नाश्ता हवा असेल तर ‘ही’ सोपी ज्वारी ऑम्लेट रेसिपी नक्की ट्राय करा

आजचे राशिभविष्य - 19 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : सहकार्याचा ध्रुव

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT