राज्य सरकारने 23 पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती देऊन बदल्या केल्या आहेत.
मुंबई - राज्य सरकारने 23 पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती देऊन बदल्या केल्या आहेत. उपअधीक्षक आणि सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या बहुतांश अधिकाऱ्यांना पोलिस उपायुक्त आणि पोलिस अधीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. अश्विनी पाटील आणि राहुल मदने यांची नागपुरात पोलिस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिलवंत नांदेडकर यांना औरंगाबादचे पोलीस उपायुक्त बनवण्यात आले आहे. पियुष जगताप यांच्याकडे यवतमाळच्या अप्पर पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. बाबुराव महामुनी यांची बुलढाणा अतिरिक्त पोलीस अधीक्षक करण्यात आली आहे. जयंत बजवले मीरा भाईंदर यांची वसई विरार येथे पोलीस उपयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक वीरकर यांना पदोन्नती देण्यात आली असली तरी अद्याप त्यांची नियुक्ती झालेली नाही.
प्रशांत परदेशी पोलीस उपायुक्त मंत्रालय सुरक्षा म्हणून, प्रीती टिपरे पोलीस उपायुक्त डायल 112 नवी मुंबई तर समीर शेख पोलीस अधीक्षक, राज्य नियंत्रण कक्ष येथे नियुक्ती करण्यात आली. अधिकारी रीना जनबंधू अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अश्विनी पाटील पोलीस उपयुक्त -एसआयडी, ईश्वर कातकाडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, भंडारा, प्रीतम यावलकर पोलीस अधीक्षक– सायबर सिक्युरिटी मुंबई, अर्चना पाटील पोलीस अधीक्षक, राज्य अनुसूचित जाती आयोग, दत्ता तोटेवाड अतिरिक्त पोलीस महासंचालक (विशेष कार्य), शीतल रत्नाकर नवले आणि पंकज शिरसाट यांची पोलीस उपायुक्त एसआयडी, नवनाथ ढवळे यांची पोलीस उपायुक्त ठाणे शहर आणि सागर कवाडे यांची दहशतवादविरोधी पथकात पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.