ekrukh talav, solapur

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

जागतिक पर्यटनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव! ‘हिप्परगा’ तलावात बोटिंग, परिसरात बगीचा अन्‌ पक्षी निरीक्षण केंद्र; तलावाचे आऊटलेट सिमेंटचे नव्हे तर तांबे अन्‌ बीडचे

सोलापूर-तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा गावाजवळील एकरुख तथा हिप्परगा तलावाची नोंद वर्ल्ड हेरिटेज म्हणून झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४९० वर्षांपूर्वीच्या धामापूर तलावानंतर हिप्परगा तलावाची त्यात नोंद झाली आहे. आता हिप्परगा तलावात बोटिंग, परिसरात पक्षी निरीक्षण केंद्र, बगीचा अशा जागतिक पर्यटनवाढीच्या सुविधा तयार केल्या जाणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर-तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा गावाजवळील एकरुख तथा हिप्परगा तलावाची नोंद वर्ल्ड हेरिटेज म्हणून झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४९० वर्षांपूर्वीच्या धामापूर तलावानंतर हिप्परगा तलावाची त्यात नोंद झाली आहे. आता हिप्परगा तलावात बोटिंग, परिसरात पक्षी निरीक्षण केंद्र, बगीचा अशा जागतिक पर्यटनवाढीच्या सुविधा तयार केल्या जाणार आहेत. त्यासाठी सोलापूरचा पाटबंधारे विभाग ‘युनेस्को’कडे प्रस्ताव देणार आहे.

कृष्णा खोऱ्यातील भीमानदीची उपनदी असलेल्या अदिला नदीवर ब्रिटिशांच्या काळात १८७१ मध्ये हिप्परगा गावाच्या परिसरात एकरुख तलाव बांधण्यात आला. हा तलाव एक हजार २२९ हेक्टरवर (३०७२ एकर) पसरला आहे. तीन वर्षांत बांधलेल्या या तलावामुळे हिप्परगा परिसरातील सुमारे ३५ गावांना, शेतीला मोठा आधार होता. पुढे सोलापूर शहरासाठीही तेथून पाइपलाइन करून पाणी आणण्यात आले.

गोड व शुद्ध पाणी असलेल्या या तलावाच्या संवर्धनासाठी देखील निधी मिळणार आहे. त्याठिकाणी जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. या तलावाच्या भेटीसाठी देशविदेशातील पर्यटक, तज्ज्ञ यावेत हा त्यामागील हेतू असणार आहे. त्यादृष्टीने प्रस्ताव तयार केला जात असून दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात तो ‘युनेस्को’ला सादर केला जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘युनेस्को’कडे पाठविला जाणार प्रस्ताव

वर्ल्ड हेरिटेज म्हणून हिप्परगा तथा एकरुख तलावाची नोंद झाली आहे. तलावाचे जतन, संवर्धनाच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ‘युनेस्को’कडे प्रस्ताव पाठविला जात आहे. त्यावर सध्या काम सुरू आहे.

- सचिन पवार, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे, सोलापूर

तलावाचे आऊटगेट चुना, तांब्याचे

अदिला नदीवरील हिप्परगा (एकरूख) तलाव १५४ वर्षांचा जुना आहे. तलावातून पाणी सोडण्यासाठी जे आऊटलेट (गेट) आहे. त्यासाठी सिमेंट, लोखंड अशांचा वापर केलेला नाही. तांबे, बीड अशा धातूंपासून तो दरवाजा तयार केला आहे. त्यासाठी चुना वापरला असून, १५४ वर्षांनंतर ते काम अजूनही मजबूत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार अतिवृष्टी, महापुराची नुकसान भरपाई; सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर

Prashant Kishor on Bihar Election: अखेर प्रशांत किशोर यांनी निवडणूक न लढवण्यामागचं नेमकं कारण सांगितलं, म्हणाले..

पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय! सोलापूर शहरात रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत नाकाबंदी; प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत एक विशेष पथक

Baidpura Violence : गोमांस विक्रीच्या संशयावरून दोन गट आमनेसामने; दोन्ही गटाकडून तक्रारी, अदखलप्राप्त गुन्हे दाखल

Pune Traffic : पुणे-सातारा बाह्यवळण मार्गावर दिवाळीच्या गर्दीत वाहतूक कोंडीचा कहर

SCROLL FOR NEXT