Tanaji Sawant
Tanaji Sawant sakal
महाराष्ट्र

3 ठिकाणी प्रस्ताव तरी निधी मिळेना! आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातील ‘सिव्हिल’मध्ये ‘सीटीस्कॅन’ मशीनच नाही

तात्या लांडगे

सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील मागील तीन-चार वर्षांपूर्वी सीटी स्कॅन मशिन बंद पडली आहे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्हा नियोजन समिती, राज्य व केंद्राच्या आरोग्य विभागाला मशिनसाठी निधी मागितला आहे. पण, अद्याप कोणाकडूनही निधी मिळालेला नाही. त्यामुळे आयुष्याची शेवटची घटका मोजणाऱ्या रुग्णांना बाहेरील हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येत असल्याची वस्तुस्थिती आहे.

दरम्यान, राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. त्यांच्या जिल्ह्यातील सोलापुरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मुख्य महत्त्वाच्या सीटी स्कॅन मशिनसह अन्य रुग्णोपयोगी बाबींची गैरसोय आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील सुधारणांसाठी प्रा. डॉ. सावंत हे या रुग्णालयाच्या सुधारणेसाठी केव्हा स्टेथोस्कोप लावणार, हे महत्त्वाचे असून त्यांच्या कार्यकाळात या शासकीय रुग्णालयात सुधारणा होण्याबद्दल जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.

डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय चालविले जाते. सर्वसामान्यांचा आधार असलेल्या या रुग्णालयाची ओळख ‘सिव्हिल’ हॉस्पिटल अशीच आहे. या ठिकाणी जवळपास तेराशेहून अधिक आजारांवर उपचार केले जातात. कोरोना काळातील रुग्णालयाचे योगदान खूप मोठे आहे. याठिकाणी ६०० ते ७०० डॉक्टर्स रात्रंदिवस सेवा देतात.

रुग्णालयाच्या ‘ओपीडी’मध्ये दररोज बाराशे ते दीड हजार रुग्ण येतात. कर्नाटकासह (विजयपूर) उस्मानाबाद, नाशिक, पुणे (इंदापूर) अशा परजिल्ह्यातूनही याठिकाणी उपचारसाठी रुग्ण येतात. पण, अलीकडे हॉस्पिटलमधील सीटी स्कॅन मशिन बंद असल्याने अतिगंभीर, गंभीर रुग्णांना सीटी स्कॅनसाठी स्ट्रेचर ठेवून बाहेरील हॉस्पिटलमध्ये न्यावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. रुग्णांसाठी आता कोणता मंत्री, आमदार, खासदार व अधिकारी पुढाकार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निधीचा प्रस्ताव दिला, काही दिवसांत मशीन बसवू

सर्वोपचार रुग्णालयातील दहा वर्षांपूर्वीची जुनी सीटी स्कॅन मशिन बंद पडली आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये, हॉस्पिटलमध्येच सर्व सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. सीटी स्कॅन मशिनसाठी जिल्हा नियोजन समिती, राज्य व केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली आहे. निधी मिळताच मशिन खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली जाईल.

- डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर

आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच ‘आरोग्या’चा खेळखंडोबा

जिल्हा रुग्णालयाचे काम फर्निचरसाठी पाच कोटींचा निधी नसल्याने अद्याप अपूर्णच आहे. जवळपास चार वर्षांहून अधिक काळ लोटला, तरीपण जिल्हा रुग्णालय सुरु झालेले नाही. दुसरीकडे जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांसाठी इमारती आहेत, पण मनुष्यबळ अपुरे असल्याने बऱ्याच ठिकाणी प्राथमिक उपचार देखील होत नाहीत.

बहुतेक प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे केवळ लसीकरण मोहिमेसाठीच असल्याची वस्तुस्थिती आहे. तेथे केवळ औषध-गोळ्या मिळतात. सीटी स्कॅन मशिन जर्मनी, जपानमध्ये बनतात, त्या मशिनची किंमत अंदाजे १२ ते १५ कोटी रुपये असते. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील असल्याने या समस्यांबाबत त्यांची भूमिका निर्णायक असणार आहे.

‘या’ रुग्णांना करावी लागते पदरमोड

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाने ज्या रुग्णांना सीटी स्कॅनची गरज आहे, त्यांच्यासाठी काटीकर हॉस्पिटलसोबत सामंजस्य करार केला आहे. दीड लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या रुग्णांचे महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून तेथे मोफत स्कॅन केले जाते. तर ‘बीपीएल’मध्ये नसलेल्या व सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना मात्र पैसे मोजावे लागतात, अशी वस्तुस्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Exam Result : आयसीएसईचे ९९.४७ टक्के, तर आयएससीचे ९८.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT