Shirdi Sai Temple esakal
महाराष्ट्र बातम्या

Shirdi Sai Temple : शिर्डीच्या साई मंदिराला CISF ची सुरक्षा? शिर्डीकर आक्रमक, बेमूदत बंदचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः शिर्डीच्या साई मंदिराला सध्या महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा आहे. परंतु आता पोलिसांऐवजी सीआयएसएफची सुरक्षा साई मंदिराला देण्याच्या हालचाली सुरु आहेत.

केंद्रीय सुरक्षा दल अर्थात सीआयएसएफच्या सुरक्षेला शिर्डीकरांनी मात्र कडाडून विरोध केला आहे. येत्या १ मे पासून केंद्राच्या या संभाव्य निर्णयाविरोधात बेमूदत शहर बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

साई मंदिराला सीआयएसएफच्या सुरक्षेसंबंधी २०१८ मध्ये सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी मुंबई उच्च न्यालायलायत धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर कोर्टाने साईबाबा संस्थानकडून म्हणणे मागवले आहे. त्यामुळे साई संस्थान या केंद्राच्या सुरक्षेला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे. शिर्डीकर मात्र आक्रमक झालेले आहेत. येत्या १ मे पासून बंदची हाक देण्यात आलीय.

यासंदर्भात आज शिर्डीमध्ये एक बैठक संपन्न झाली. याच बैठकीमध्ये सीआयएसएफ सुरक्षेला विरोध दर्शवण्यात आला. बैठकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. ग्रामस्थांनी सुरक्षेला केलेल्या विरोधानंतर शिर्डी संस्थान काय निर्णय घेते, याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान, साई मंदिराला दहशतवाद्यांकडून धमक्या आलेल्या आहेत. सध्या साई संस्थानचे कर्मचारी आणि पोलिस मंदिराला सुरक्षा पुरवतात. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने CISF कुमक गरजेची असल्याचं बोललं जात आहे. त्यासाठी कोर्टाने म्हणणं मागवलं असून संस्थान काय निर्णय घेणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमधील पूर्णत्वास आलेला पूल धोक्याचा

Gold Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात 1 तोळ्याचा भाव किती? पाहा आजचा ताजा भाव

Chandra Grahan 2026: गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी 'या' गोष्टी टाळाव्यात

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानकडून अफगाणिस्तानविरुद्ध 'थेट युद्धा'ची घोषणा; काबुल आणि कंदहारमध्ये हवाई हल्ले

SCROLL FOR NEXT