sakal breaking Esakal
महाराष्ट्र बातम्या

प्रांताधिकारी व तहसीलदारांचा दणका! मतदार नोंदणीचे काम टाळणाऱ्या १८ बीएलओंवर गुन्हे; शिक्षक, मुख्याध्यापकांचाही समावेश

मतदार नोंदणीत टाळाटाळ केल्याप्रकरणी ‘बीएलओं’वर आणि शाळेतील शिक्षकांना मतदार नोंदणीसाठी न सोडणारे मुख्याध्यापक, अशा १८ जणांविरोधात प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या आदेशानुसार उत्तर सोलापूरचे तहसीलदार सैपन नदाफ यांनी थेट सदर बझार पोलिसात फिर्याद दिली.

तात्या लांडगे

सोलापूर : मतदार नोंदणीच्या कामात टाळाटाळ केल्याप्रकरणी ‘बीएलओं’वर आणि शाळेतील शिक्षकांना मतदार नोंदणीसाठी न सोडणारे मुख्याध्यापक, अशा १८ जणांविरोधात प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या आदेशानुसार उत्तर सोलापूरचे तहसीलदार सैपन नदाफ यांनी थेट सदर बझार पोलिसात फिर्याद दिली. त्या १८ जणांविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने ‘बीएलओं’चे धाबे दणाणले आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १ जानेवारी २०२४ पर्यंत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी २१ सप्टेंबर ते २१ ऑगस्ट या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम पार पाडतील असे आदेश देण्यात आले होते. परंतु, काही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षकांनी या कामात टाळाटाळ केली. त्यावेळी त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही काम करण्यास नकार दिला.

उत्तर सोलापूर तहसीलदारांकडे ५६८ बीएलओ होते. त्यांनी केवळ २५ टक्केच काम पूर्ण केले आहे. वारंवार सूचना करूनही त्या १८ जणांनी निवडणूकीच्या कामात केलेल्या कसूरीस अनुसरुन लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१चे कलम १३४ व लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५०चे कलम ३२ नुसार सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात आपल्या शाळेतील शिक्षकांना मतदार नोंदणीसाठी न सोडलेल्या मुख्याध्यापकांचाही समावेश आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांबद्दल...

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी दोन (सेवासदन प्रशाला), महापालिका शाळा क्र. तीन आणि महापालिकेच्या चार कर्मचाऱ्यांसह नूमवि मराठी शाळा, त्र्यंबकेश्वर विद्यालय, सरस्वती तुमप्पा प्रशाला, सोनामाता आदर्श विद्यालय, सिध्देश्वर बालक मंदीर, तसेच मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक (संभाजीराव शिंदे प्रशाला, विडी घरकूल), शहा कोठारी प्रशाला, त्र्यंबकेश्वर विद्यालय व कुचन प्रशाला (रविवार पेठ) येथील प्रत्येकी एकजण, अशा १८ जणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

दुसऱ्या बीएलओंच्या मदतीने काम सुरु

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १ जानेवारी २०२४पर्यंत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी २१ सप्टेंबर ते २१ ऑगस्टपर्यंत ‘बीएलओं’नी घरोघरी जाऊन मतदार सर्वेक्षण करणे अपेक्षित होते. तशा वारंवार सूचनाही केल्या, तरीपण १८ ऑगस्टपर्यंत २५ टक्केच काम झाले आहे. आता दुसऱ्या ‘बीएलओं’कडून ते काम पूर्ण करून घेतले जाणार आहे.

- सैफन नदाफ, तहसीलदार, उत्तर सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT