cash solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

प्र कुलगुरूंच्या नव्या गाडीसाठी १५ लाखांची तरतूद! विद्यापीठ उभारणार ४.५० कोटींचे डेटा सेंटर; प्रस्तावित ‘गोशाळा’ नावावरून वादंग, शेवटी नाव बदलले

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचे २५१ कोटी ३६ लाख २५ हजार रुपयांचे अंदाजपत्रक आज (बुधवारी) दुरुस्तीसह मंजूर झाले. या अंदाजपत्रकात ४६ कोटी २९ लाख ४३ हजार रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे. अंदाजपत्रकात प्र कुलगुरूंच्या नवीन गाडी खरेदीसाठी १५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचे २५१ कोटी ३६ लाख २५ हजार रुपयांचे अंदाजपत्रक आज (बुधवारी) दुरुस्तीसह मंजूर झाले. या अंदाजपत्रकात ४६ कोटी २९ लाख ४३ हजार रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे. अंदाजपत्रकात प्र कुलगुरूंच्या नवीन गाडी खरेदीसाठी १५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तर विद्यापीठ स्थापनेपासूनच सर्व डेटा एकत्रित सुरक्षितपणे साठवून ठेवण्यासाठी विद्यापीठात सुमारे साडेचार कोटींचा खर्च करून स्वत:चे डेटा सेंटर उभारण्याचा निर्णय यावेळी झाला.

विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात बुधवारी (ता. १२) कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक पार पडली. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्यासह अधिसभेचे सदस्य उपस्थित होते. कुलसचिव योगिनी घारे यांनी सभेच्या सदस्य सचिव म्हणून काम पाहिले. वित्त व लेखा अधिकारी डॉ. महादेव खराडे यांनी अंदाजपत्रक सादर केले. बजेटच्या सुरवातीला विद्यापीठाकडे जमा ६२ लाखांचा विद्यार्थी आपत्कालीन निधी विद्यार्थ्यांसाठीच खर्च व्हावा, अशी मागणी सदस्यांनी लावून धरली. त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली. दरम्यान, वार्षिक अंदाजपत्रक दुरुस्तीसह मंजूर झाल्यावर वार्षिक अहवाल सादर करण्यात आला. त्यालाही दुरुस्तीसह मान्यता देण्यात आली.

पाच अध्यासन केंद्रांनाही निधी

विद्यापीठात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र, छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र, महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र, या पाचही अध्यासन केंद्रांना प्रत्येकी ३० लाखांच्या निधीची तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.

अंदाजपत्रकातील ठळक मुद्दे...

  • मुलींसाठी ‘मुली शिकवा, समाज घडवा’ला पाच लाख तर कमवा व शिका योजनेसाठी १५ लाख रुपयांची तरतूद

  • आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन कौशल्य दाखविण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी

  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीवर्ष कार्यक्रम साजरा करण्यासाठी ७५ लाखांची तरतूद

  • विद्यापीठातील महिला कक्षासाठी दोन लाख तर ‘पीएम-उषा’मधूनही पाच लाखांचा निधी

  • विद्यापीठातील ११ संकुलांना नवीन स्कॅनिंग मशिन, त्यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद

‘गोशाळा’ नावावरून वादंग; नावात बदलाचा निर्णय

‘विद्यापीठातील गोशाळेसाठी दहा लाखांची तरतूद’ असे बजेटमध्ये नमूद होते. त्यात गाईच्या शेण, मूत्रापासून विविध वस्तू तयार करण्यासंदर्भातील कौशल्य विकासाचे कोर्स अपेक्षित आहेत. पण, गोशाळेच्या नावावरून सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा वेगळाच अजेंडा चालवत असल्याचा गंभीर आरोप केला. शासनाकडून त्या नावावरून अनुदान जास्त मिळते म्हणून नाव दिल्याचे प्र कुलगुरू म्हणाले. तरीपण, नावात बदलाची मागणी डोंगरेंनी शेवटपर्यंत केली. त्या चर्चेत प्रा. विरभद्र दंडे, रोहिणी तडवळकर, मल्लिनाथ शहाबादे, डॉ. भगवान आदटराव, राजाभाऊ सरवदे यांनी सहभाग घेतला. प्रा. दंडे, तडळवकर, शहाबादे यांनी तेच नाव ठेवण्याचा आग्रह धरला. शेवटी नावात दुरुस्ती करून ‘आयुर्वेदिक सेंटर’ नाव करण्याचा निर्णय झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Statement : खैमेनींच्या माघारी इराणचे प्रमुख खतीबजादेह यांची जबाबदारी, शेवटची गोळीपर्यंत लढण्याचा केला निर्धार, युद्ध आणखी पेटणार

Gold Rate Today: आज सोन्याच्या भावात मोठा बदल! एक तोळा सोन्याचा भाव किती? जाणून घ्या ताजा भाव

Axar Patel: अहमदाबादमध्ये सामना? मैं हूँ ना ! अंतिम सामन्याबाबत अक्षर पटेलकडून निर्धास्त राहण्याचा दिलासा

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Success Story: गिरवीचा विशाल वाघ ठरला राज्यात अव्‍वल; पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, सर्व स्तरांतून होतेय कौतुक

SCROLL FOR NEXT