Puja Khedkar parents divorce centre asks pune police about their marital status  
महाराष्ट्र बातम्या

Puja Khedkar: बोगसगिरी करुन नोकरी मिळवलेल्यांचा UPSC शोध घेणार; कोर्टाने आदेशात नेमकं काय म्हटलं?

Patiala house court: नाव बदलून अनेकवेळा यूपीएससीची परीक्षा दिल्यानंतर युपीएससीनं तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. तसंच तिला आपली बाजू मांडण्यासाठी ३१ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंतची मुदत दिली होती. पण पूजानं मुदत उलटून गेली तरी काहीच उत्तर दिलं नव्हतं.

संतोष कानडे

UPSC Decision: चुकीच्या पद्धतीने सूट मिळवून आयएएस पद गमावलेल्या पूजा खेडकर हिच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे. दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टाने पूजाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. अशा बोगस पद्धतीने आयएएस आणि आयपीएस झालेल्या अधिकाऱ्यांचा शोध घेण्याचे निर्देश कोर्टाने यूपीएससीला दिले आहेत.

निकाल देताना कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

पात्र नसताना ज्यांनी चुकीच्या पद्धतीने सूट मिळवली, अशा लोकांचा शोध घेण्याचे निर्देश कोर्टाने UPSC ला दिले आहेत. याशिवाय पूजा खेडकरला UPSC मधील कोणी मदत केली आहे का? याचाही तपास करण्याचे निर्देश कोर्टाने पोलिसांना दिले.

जामीन अर्ज फेटाळला

नाव बदलून अनेकवेळा यूपीएससीची परीक्षा दिल्यानंतर युपीएससीनं तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. तसंच तिला आपली बाजू मांडण्यासाठी ३१ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंतची मुदत दिली होती. पण पूजानं मुदत उलटून गेली तरी काहीच उत्तर दिलं नव्हतं. पूजानं दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली होती त्याचा निकाल कोर्टानं राखून ठेवला होता. गुरुवारी हा निकाल जाहीर करताना पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

आयएएस पद रद्द...

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा-2022 च्या माध्यमातून तात्पुरती शिफारस केलेली उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिची उमेदवारी रद्द केली आहे. शिवाय तिला भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीतून कायमचे बाद करण्यात आलेले आहे. हा निर्णय यूपीएससीने गुरुवारी घेतला.

पूजा खेडकर हिच्यावर आजवरची ही सर्वात मोठी कारवाई समजली जातेय. सुरुवातीला पूजाची पुण्यातून वाशिम येथे बदली झाली होती. त्यानंतर प्रशिक्षण संस्थेने तिचं ट्रेनिंग थांबवलं होतं. पुढे यूपीएससीने तिच्यावर नाव बदलून परीक्षा दिल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंद केला होता. आता यूपीएससीने तिचं आयएएस पद रद्द ठरवलं असून भविष्यातील कोणतीही परीक्षा तिला देता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT