ias Puja Khedkar UPSC cancels the provisional candidature  esakal
महाराष्ट्र बातम्या

Puja Khedkar: मोठी कारवाई! पूजा खेडकरची उमेदवारी रद्द, UPSCचा मोठा निर्णय; भविष्यातही देता येणार नाही परीक्षा

UPSC cancels the provisional candidature of Puja Khedkar : प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्यावर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे.

संतोष कानडे

Pooja Khedkar News: प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्यावर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. तिचं IAS पद रद्द करण्यात आलंय.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा-2022 च्या माध्यमातून तात्पुरती शिफारस केलेली उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिची उमेदवारी तात्पुरती रद्द केली आहे. शिवाय तिला भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीतून कायमचे बाद करण्यात आलेले आहे.

पूजा खेडकर हिच्यावर आजवरची ही सर्वात मोठी कारवाई समजली जातेय. सुरुवातीला पूजाची पुण्यातून वाशिम येथे बदली झाली होती. त्यानंतर प्रशिक्षण संस्थेने तिचं ट्रेनिंग थांबवलं होतं. पुढे यूपीएससीने तिच्यावर नाव बदलून परीक्षा दिल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंद केला होता. आता यूपीएससीने तिचं आयएएस पद रद्द ठरवलं असून भविष्यातील कोणतीही परीक्षा तिला देता येणार नाहीये.

पूजा खेडकरने आयएएस पद मिळवण्यासाठी अनेक कारनामे केले होते. तिने एक-दोन नव्हे तर तब्बल तीन दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याची माहिती पुढे आली होती. त्याची चौकशी सुरु आहे. याशिवाय तिने यूपीएससी परीक्षेच्या जास्त संधी मिळाव्यात, यासाठी नाव बदलून परीक्षा दिल्या होत्या.

ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पूजाने आई-वडिलांपासून वेगळं राहात असल्याचा बनाव करुन खोटी कागदपत्रं दाखल केल्याचं प्रकरणतही समितीसमोर चौकशीसाठी आहे. वास्तविक पूजाच्या कुटुंबाकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचे निष्पन्न झालं आहे.

पूजाचं प्रकरण पुढे आल्यानंतर तिच्या आईने बंदुकीचा धाक दाखवून मुळशी येथे शेतकऱ्यांना धमकावल्याचं प्रकरण पुढे आलं. त्या प्रकरणात मनोरमा खेडकरवर गुन्हा दाखल झाला. पुण्यातल्या बाणेर रोडवरील त्यांच्या घराचा काही भाग बेकायदेशीर असल्याने त्यांना मनपाने नोटीस पाठवली होती. एवढंच नाही तर पूजाच्या वडिलांनी बारामती येथे वडिलांचं नाव बदलून जमीन खरेदी केल्याचं प्रकरणही उघड झालं. एकूणच खेडकर कुटुंबाचे सगळं कारनामे मागच्या महिन्याभरात पुढे आले होते.

आता यूपीएससीने पूजावर कारवाई करत तिचं आयएएस पद रद्द केलं आहे. याशिवाय तिला भविष्यात या परीक्षा देता येणार नाहीत. ही आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे. मागे तिच्यावर गुन्हा दाखल झाला असून तिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कोर्टाने अटकेपासून बचाव करण्याच्या निर्णयावरील निकाल राखून ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT