ATS officers in Solapur for investigations to Juber Hungergekar.

 

Sakal

महाराष्ट्र बातम्या

मोठी ब्रेकिंग! पुण्यातील ‘ATS’चे पथक सोलापुरात; सोलापूरचा आयटी इंजिनिअर जुबेर हंगरगेकरची अटक अन्‌ दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या अनुषंगाने तपास, अधिकारी म्हणाले...

सोलापूर शहरातील जुबेर हंगरगेकर याच्यावरील कारवाई आणि दिल्लीतील बॉम्बस्फोटाचा काही संबंध आहे का, याचा सखोल तपास ‘एटीएस’कडून सुरु आहे. त्यासाठी पुण्यातील ‘एटीएस’ पथक सोलापुरात मुक्कामी आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : सोलापूर शहरातील जुबेर हंगरगेकर याच्यावरील कारवाई आणि दिल्लीतील बॉम्बस्फोटाचा काही संबंध आहे का, याचा सखोल तपास ‘एटीएस’कडून सुरु आहे. त्यासाठी पुण्यातील ‘एटीएस’ पथक सोलापुरात मुक्कामी आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित बरेच काही साहित्य, कागदपत्रे, संपर्क क्रमांक जुबेरकडे सापडले आहेत. देशभरात विशेषत: महाराष्ट्रात ‘एटीएस’ची कारवाई सुरु असतानाच दिल्लीत बॉम्बस्फोट झाला. त्यामुळे जुबेरच्या अटकेशी त्या घटनेचा संबंध तर नाही ना, यादृष्टीने तपास सुरु आहे. बॉम्बस्फोटानंतर ‘एटीएस’ने मुंब्रा व कोंढवा येथून जुबेरशी संबंधित दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, वहादते मुस्लिम- ए- हिंद संघटनेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी जुबेर १८ ते २० ऑक्टोबरला सोलापुरात मुक्कामी होता. त्यापूर्वी तो चेन्नईला जाऊन आला होता.

कोंढव्यात रहाणारा जुबेर सोलापुरातील अनेकांच्या संपर्कात होता. त्याअनुषंगाने तपास करण्यासाठी यापूर्वी देखील ‘एटीएस’चे पथक सोलापुरात येऊन गेले होते. त्यावेळी एकाला चौकशीसाठी पुण्याला नेले होते. पुण्यातून जुबेरचा मित्र, जो आयटी इंजिनिअर असून तोही मूळचा सोलापूरचाच आहे. त्यालाही ताब्यात घेतले होते.

आता ‘एटीएस’चे पथक सोलापुरात आले असून जुबेरशी संबंधित सर्व बाबींचा खोलात जाऊन तपास केला जात आहे. शुक्रवारी (ता. १४) नेमका काय तपास झाला याबद्दल तपशीलवार माहिती मिळू शकली नाही. पण, काही जणांकडे जुबेरच्या अनुषंगाने तपास केला जात आहे.

तपास पथक आज ‘येथे’ करणार तपास

जुबेर सोलापूर शहरातील शास्त्री नगर भागात रहायला होता. त्याचे शिक्षण सोलापुरातच झाले असून नोकरीच्या निमित्ताने जुबेर सहा-सात वर्षांपूर्वी कोंढव्यात रहायला गेला. त्याचा ‘अल कायदा’शी संबंध असल्याच्या संशयातून ‘एटीएस’ने अटक केली असून आता तो न्यायालयीन कोठडीत आहे. सोलापुरात आलेल्या ‘एटीएस’ पथकासोबत सोलापूर ‘एटीएस’चे पथकही आहे. शहर पोलिसांच्या मदतीने शनिवारी हे पथक जेलरोड, सदर बझार व वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाऊन अधिक तपास करू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT