supriya sule Esakal
महाराष्ट्र बातम्या

Anand Dave: "सुप्रियाताई, पवारसाहेबांचं तत्व तुम्ही पाळायला हवं, एवढा पुरोगामीपणा बरा नव्हे"

सुप्रिया सुळे यांनी मटण खावून मंदिरात जात देवदर्शन केल्याचा आरोप शिवतारे यांनी केला

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी मांसाहार करून मंदीरात गेल्याचा आरोप केला असून याबद्दलचे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. या आरोपांवर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रतिक्रिया देताना हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सडकून टीका केली आहे. सुप्रियाताईंनी शरद पवारसाहेबांकडून हिंदू धर्म शिकून घ्यावा. मंदिरात जाण्याआधी मांसाहार करू नये किंवा मांसाहार करून मंदिरात जाऊ नये असं आनंद दवे यांनी म्हंटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, शरद पवारसाहेबांनी पाळलेली ही तत्वे सुप्रियाताईंनी सुद्धा पाळायला हवी होती. इतका पुरोगामीपणा निदान जाहीरपणे करणं बरं नव्हे, सुप्रियाताई!, असं आनंद दवे यांनी म्हंटलं आहे. शिवसेनचे नेते विजय शिवतारे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप केले आहेत. मटण खावून मंदिरात जात देवदर्शन केल्याचा आरोप शिवतारे यांनी केला आहे. त्यावरून आनंद दवे यांनीही सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

तर विजय शिवतारे यांनी केलेल्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, विजय शिवतारे यांनी केलेल्या आरोपांवर माझ्या वाचनात अजून काही आलं नाही. संपूर्ण भागात पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे मी बघत आहे त्यामुळे ते काय बोलले मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

काय म्हणाले आनंद दवे?

हिंदू धर्माच्या प्रथा आणि परंपरा शरद पवार यांच्याकडून सुप्रिया सुळे यांनी शिकायला हवा. मी नॉन व्हेज खाल्ले म्हणून मी मंदिरात जाणार नाही म्हणणाऱ्या पवार साहेबांची मुलगी नॉन व्हेज खाऊन त्याचा व्हिडिओ चित्रीकरण करू देण्यास परवानगी देऊन जाहीरपणे मंदिरात जाते. हिंदू धर्माच्या भावना दुखवण्याचं काम मुद्दाम राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे असं हिंदू महासभेचं स्पष्ट म्हणणं आहे असं आनंद दवे म्हणाले आहेत.

विजय शिवतारे यांनी काय म्हटलं आहे?

विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवरील देवदर्शनाचे चार फोटो शेअर केले आहेत. तसेच हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना त्यावर कमेंट केली आहे. आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला||, अशी टीका शिवतारे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधान परिषद निवडणूक; कुणाच्या गळ्यात पडणार आमदारकीची माळ? भाजपाकडून नागपूरमधील 'या' तीन नावाची चर्चा...

Mumbai: पाणीटंचाईमुळे शस्त्रक्रिया रखडल्या! मुंबईतील रुग्णालयांत रुग्णसेवेवर परिणाम, अनेकांना पुढची तारीख

Satara Gram Panchayat Elections : 874 ग्रामपंचायतींची रणधुमाळी लांबणीवर? मे-जूनमध्ये निवडणूक होणे का आहे अशक्य? प्रशासकीय हालचालींना वेग

US-इराण युद्धात लहानसा देश मालामाल, होर्मुझ बंदचा फायदा; एका जहाजासाठी मिळतायत ३३ कोटी

ईद 2027 साठी सलमान खानचा मोठा धमाका ! दिग्दर्शक वंशी पैदीपल्लींसोबत पुढच्या ॲक्शनपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT