Maharashtra Kesari esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Kesari : आता पुढचं लक्ष्य... 'महाराष्ट्र केसरी' पटकावल्यानंतर शिवराजचा संकल्प

संतोष कानडे

पुणेः यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पैलवाल शिवराज राक्षे याने पटकावला आहे. पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीमध्ये आज ६५ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली.

कुस्ती जिंकल्यानंतर शिवराजने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, आज खूप आनंद होतोय. आई-वडील येथे आलेले नाहीत परंतु त्यांनाही खूप आनंद झाला असेल. वस्ताद काका पवार यांच्यामुळेच हे शक्य झाल्याचं शिवराजने सांगितलं.

तो पुढे म्हणाला की, माझं पुढचं लक्ष्य हे ऑलिम्पिक आहे. आजचा आनंद शब्दांमध्ये व्यक्त करु शकत नाही. असं म्हणून त्याने सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

शिवराज राक्षेने गतवेळच्या महाराष्ट्र केसरीमधून माघार घेतली होती. त्याला खांद्याची दुखापत झाल्याने त्याने माघार घेतली होती. तो गतवेळी देखील महाराष्ट्र केसरीच्या संभाव्य विजेत्यांमध्ये गणला जात होता. अखेर महाराष्ट्र केसरी होण्याचे त्याचे स्वप्न 2023 मध्ये पूर्ण झाले.

शिवराजला महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा आणि 5 लाख रूपये बक्षीस रक्कम मिळेल. त्याचबरोबर शिवराजला महिंद्रा थार ही एसयुव्ही देखील पटकावली.

सेमी फायनलमध्ये माती विभागातून पै महेंद्र गायकवाड विरूध्द पै सिंकदर शेख यांच्यात कुस्ती झाली. ही कुस्ती पै महेंद्र गायकवाडने मारत थेट अंतिम सामन्यात धडक मारली, तर मॅट विभागातील सेमी फायनलमध्ये शिवराज राक्षे विरूद्ध हर्षवर्धन सदगीरला असा सामना झाला. हा सामना पै शिवराज राक्षेने 8-2 अशा एकतर्फी फरकाने जिंकत अंतिम सामन्यात धडक मारली.

महाराष्ट्र केसरीसाठी महेंद्र गायकवाड विरूद्ध शिवराज राक्षे यांच्यामध्ये लढत झाली. दरम्यान या लढतीत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अवघ्या दोन मिनिटात चितपट करत महाराष्ट्र केसरीच्या किताबावर आपलं नाव कोरलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT