महाराष्ट्र

राज्यात काही ठिकाणी आज, उद्या मुसळधार

सकाळवृत्तसेवा

पुणे - उत्तरेकडून मॉन्सूनच्या परतीचा पाऊस आणि स्थानिक वातावरण यामुळे राज्यात ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. रविवारी (ता. ८) आणि सोमवारी (ता. ९) गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार; तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बऱ्याच ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे. मॉन्सूनच्या परतीचा प्रवास आठ दिवसांपूर्वी राजस्थानमधून सुरू झाला आहे. तो आता महाराष्ट्र, मध्य भारतापर्यंत पोचला आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणारा परतीचा पाऊस, स्थानिक वातावरण यामुळे राज्यभरात पाऊस पडत आहे. दोन दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल झाला आहे.

राज्यातील तापमान वाढले असून हवेत बाष्पदेखील आहे. त्यामुळे दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे. पुण्यातही पाऊस हजेरी लावत आहे. विशेषतः उपनगरांमध्ये कात्रज, पाषाण, सिंहगड रस्ता या भागात संध्याकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. पुढील आठवड्यातही असाच पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

हवामानात सोमवारपर्यंत (ता. ९) मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. परिणामी, राज्यातील अनेक भागांत वीज पडण्याच्या घटनांसह वादळी वारे आणि जोरदार पावसाचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांनी येत्या दोन ते तीन दिवसांत शेतीमालाची काढणी टाळावी, काढलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, जनावरांची काळजी घ्यावी आदी सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT