Maharashtra Rain Alert esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Alert : लंडनसारख्या शहरांमध्ये पाण्याचा निचरा कसा होतो? मुंबई-पुणं पाण्याखाली का जातं? वाचा सविस्तर...

london drainage system : लंडनमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टरवर लक्ष केंद्रीत केलेलं आहे. या तंत्रज्ञानावर आधारित इमारतींचं स्ट्रक्चर उभं करण्यात आलेलं आहे. पावसाच्या पाण्याचा संचय करुन त्याचा वापर केला जातो. लंडनमधल्या म्युझियम ऑफ लंडन इमारतीचं ८५० वर्ग मीटरचं छत आहे. येथे २५ हजार लिटर पाणी हार्वेस्ट आणि म्हणजेच स्टोअर केलं जातं. या पाण्याचा उपयोग टॉयलेट फ्लशिंग आणि शेतीसाठी होतो.

संतोष कानडे

Pune Rain updates : राज्यातल्या अनेक भागांमध्ये बुधवारपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. बुधवारी रात्रभर झालेल्या पावसाने मुंबई-पुणे यासारखी मोठी शहरं जलमय झाली आहे. आपल्याकडच्या आपत्ती व्यवस्थापनाचा बेगडी कारभार दरवर्षी असाच उघडा पडतो. मात्र जगभरात ज्या शहराचं उदाहरण दिलं जातं, त्या लंडन शहरामध्ये रस्त्यावर पाण्याचा थेंबही दिसत नाही. त्यांचं मान्सून व्यवस्थापन नेमकं कसं आहे, ते पाहूया.

दिल्ली आणि मुंबई ही दोन शहरं अत्यंत जुन्या आणि अपुऱ्या ड्रेनेज सिस्टममुळे जलमय होतात. ही जुनी यंत्रणा जास्त पावसाचा सामना करु शकत नाही. त्यामुळे शहरांमध्येच पुरासारखी परिस्थिती निर्माण होते. प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यात तीन-चार वेळेला मुंबई, पुणे आणि दिल्ली या शहरांमध्ये पाणी अडून राहातं.

लंडनमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टरवर लक्ष केंद्रीत केलेलं आहे. या तंत्रज्ञानावर आधारित इमारतींचं स्ट्रक्चर उभं करण्यात आलेलं आहे. पावसाच्या पाण्याचा संचय करुन त्याचा वापर केला जातो. लंडनमधल्या म्युझियम ऑफ लंडन इमारतीचं ८५० वर्ग मीटरचं छत आहे. येथे २५ हजार लिटर पाणी हार्वेस्ट आणि म्हणजेच स्टोअर केलं जातं. या पाण्याचा उपयोग टॉयलेट फ्लशिंग आणि शेतीसाठी होतो.

लंडनमधील शहरी ड्रेनेज सिस्टीम

लंडनमधील शहरी ड्रेनेज सिस्टीम, ही यंत्रणा पाण्याचा निचरा करण्याकामी मोलाची भूमिका बजावते. लंडनमध्ये स्मार्टवॉटर व्यवस्थापन तंत्रज्ञान योग्य पद्धतीने काम करतं. त्यामुळे सीवरेज सिस्टीमवर कमी ताण पडतो. स्मार्टवॉटर यंत्रणेच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याला योग्यवेळी व्यवस्थापित केलं जातं. हे पाणी एका ठिकाणी साठवून त्याचा वापर केला जातो. त्यामुळे पावसाचं पाणी विनाकारण सीवरेज सिस्टीममध्ये जात नाही. उलट सीवरशिवाय स्वच्छ जलस्त्रोतांमध्ये जावून पाणी साठलं जातं.

लंडन सरकार रेनवॉटर हार्वेस्टिंगला मोठ्या प्रमाणावर चालना देतं. त्यासाठी कठोर कायदे बनवण्यात आलेले आहेत. प्रत्येक नवीन इमारतीमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग केलं जातं. मात्र आपल्याकडे याबाबतील म्हणावी तेवढी जागरुकता नाही. त्यामुळे शहरं पाण्याखाली जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: LPG सिलेंडर महागला, मग पेट्रोल-डिझेलचे काय? महिन्याच्या सुरुवातीलाच नवे दर जाहीर; महाराष्ट्रात कितीला मिळतंय?

Timber Transport Bribe : सागवान वाहतुकीसाठी लाच; तिघे जाळ्यात कंत्राटी संगणक ऑपरेटरला रंगेहात पकडले; जुन्या घराच्या लाकडासाठी मागितले पैसे

WCL Officer Bribe Case : बिलासाठी मागितली ५० हजारांची लाच डब्ल्यूसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सीबीआयच्या जाळ्यात

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार पडळकर, खाडेंसह ६४ अर्ज दाखल; अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Sangli Crime : सांगली हादरली! गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार; 'शिवप्रतिष्ठान युवा'च्या तत्परतेने इम्रानवर गुन्हा, आणखी 20 महिला जाळ्यात अडकल्याचा दावा

SCROLL FOR NEXT