Indian Meteorological Department issues an Orange Alert for Pune, Satara, and Kolhapur districts due to heavy rainfall predictions. sakal
महाराष्ट्र बातम्या

Heavy Rainfall Prediction: पुणे, सातारा अन् कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून 'ऑरेंज अलर्ट'!

IMD issues Pune weather alert : दक्षिण महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा

Mayur Ratnaparkhe

IMD Issues Orange Alert for Pune, Satara, and Kolhapur: पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. दक्षिण महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. तर कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, जालना, परभणी, नांदेड, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

याशिवाय  महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाच्या सरींची शक्यता असल्याने, तसेच दक्षिण महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.

मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्यास पोषक हवामान झाल्याने कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी सुरूच आहेत. पूर्व विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, सिंदेवाही येथे सर्वाधिक १११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. बुधवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ‎नागपूर येथे राज्यातील उच्चांकी ३२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली आज(गुरूवार) ओडिशामध्ये जमिनीवर येण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेरपासून, दामोह, पेंद्रा रोड कमी दाबाचे केंद्र ते पूर्व - मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil : तिन्ही गॅझेटमध्ये वैयक्तिक माहिती नाही; जरांगे यांची मागणी निरर्थक असल्याचे मत

USA School Shooting : अमेरिकेतील शाळेत भयानक गोळीबार! तीनजण ठार, २० जखमी

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी न होणाऱ्यावर गावकऱ्यांची नजर

Stamp Duty: राज्य सरकारची मोठी घोषणा! पीएम आवास योजनेतील घरे आणि लहान निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ

Maratha Morcha : मराठा मोर्चामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गुरुवारी बंद

SCROLL FOR NEXT