radhakrishna vikhe patil esakal
महाराष्ट्र बातम्या

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण

विधीमंडळाच्या अधिवेशनासह कार्यक्रमांत विनामास्क लावली होती हजेरी.

सुधीर काकडे

भाजप नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोना विषाणुची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. विखे पाटील यांनी गेल्या काही दिवसांत अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती. अहमदनगर येथील रुग्णालयात त्यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यामध्ये त्यांचा अहवाल सकारात्मक आला आहे. (Radhakrishna Vikhe Patil covid 19 positive)

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला देखील ते उपस्थित होते. धक्कादायक म्हणजे काल अहमदनगरमध्ये माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या मुलाच्या लग्नात देखील उपस्थित होते. या ठिकाणी ते विनामास्क वावरताना दिसून आले होते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत या लग्न सोहळ्यात अनेक बडे नेते देखील होते. विखे पाटील यांच्यासोबत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) हे देखील उपस्थित होते.

आपली कोरोना चाचणी सकारात्मक आल्यानंतर विखे पाटील यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले, "आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT