Radhakrishna Vikhe Patil News | Ajit Pawar Devendra Fadnavis
Radhakrishna Vikhe Patil News | Ajit Pawar Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र

अजित पवार- फडणवीसांनी पुन्हा सरकार आणावं; राधाकृष्ण विखेंची 'ऑफर'

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सध्या जोरदार सत्ताकारण सुरू आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा यांचे एकमेकांवर पलटवार, शह-प्रतिशह सुरू आहेत. अशातच भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं एक विधान चांगलंच चर्चेत येतंय. विखेंनी अजित पवारांना भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली आहे. (Ajit Pawar and Devendra Fadnavis should come together and form government)

नगरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राधाकृष्ण विखे पाटील (BJP Leader Radhakrishna Vikhe Patil) यांनी हे विधान केलं आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उत्तम प्रशासक आणि स्ट्रेट फॉरवर्ड नेते आहेत. त्यांनी राज्यात लवकरात लवकर भाजपाचे सरकार आणावे. अजित पवारही (Ajit Pawar) स्पष्टवक्ते आणि शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी पुन्हा आमच्यासोबत यावे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे संयमी आणि मितभाषी आहेत. पण त्यांनी चुकीच्या सल्लागारांची संगत सोडावी, असा सल्लाही विखे पाटलांनी दिला आहे. पुढील काळात मंत्री नव्हे तर विरोधी पक्षनेता व्हायला आवडेल, असंही ते म्हणाले आहेत. तसंच लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपात जाण्याचा निर्णय योग्य आणि आयुष्याला कलाटणी देणारा होता, अशी भावनाही व्यक्त केली.

दरम्यान, त्यांचे चिरंजीव आणि भाजपा खासदार सुजय विखे पाटील (BJP MP Sujay Vikhe Patil) यांनी शिवसेनेचं कौतुक केलं आहे. आपल्याला खासदार करण्यात शिवसेनेचा ५० टक्के वाटा असल्याने आपण शिवसेनेची साथ कधीही सोडणार नाही. मग मोदी आणि फडणवीसांनी कारवाई केली तरी चालेल, असं सुजय विखे म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT