rahul Gandhi Bacchu kadu Sakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधीवरील कारवाई चुकीची; अशी घाई सरकारने... - बच्चू कडू

माझी आमदारकी गेली तर मी आनंद साजरा करेन, असंही ते म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी काल रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर देशातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निर्णयावरुन बच्चू कडू यांनी सरकारला टोला लगावला आहे. तसंच आपली आमदारकी गेली तर आपल्याला आनंदच होईल, असंही ते म्हणाले आहेत.

राहुल गांधींवर झालेल्या कारवाईवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई चुकीची वाटते. ही घाईघाईत केलेली कारवाई आहे. अशी घाई सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करावी. सरकारने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

राहुल गांधी यांच्याप्रमाणेत राज्यात बच्चू कडू यांचीही आमदारकी रद्द व्हायला हवी, अशा आशयाचे पोस्टर्स राज्यात लागले आहेत. त्यावरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू यांनाही दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना बच्चू कडू म्हणाले, "बॅनर लावलेले कार्यकर्ते अतिउत्साही आहेत. मी केलेलं आंदोलन स्वतःसाठी नाही. मी अपंग बांधवांसाठी केलं. मला दोन गुन्ह्यांमध्ये एक-एक वर्षांची शिक्षा आहे. माहिती घेत नसल्यामुळेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी मागे आहेत."

माझ्यावर कारवाई झाली, आमदारकी रद्द झाली तर मला आनंदच होईल, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: 5 मिनिटांत 1 लाखाचे 44 लाख? सेन्सेक्सच्या तुफान हालचालीने खळबळ; नेमकं काय घडलं?

Samruddhi Mahamarg Robbery : समृद्धी महामार्गावर वकिलाच्या कुटुंबाला घेरून मारहाण! 18 लाखांचे सोने अन् रोकड लुटली; गोळीबारानंतर दरोडेखोर झाले पसार

Police Sub Inspector Crime : पोलीस उपनिरीक्षकाने रेल्वेखाली घेतली उडी, नेमकं कोणत्या कारणातून उचललं टोकाचं पाऊल

Maharashtra Monsoon Prediction : भाजप नेते राम कदम यांनी ममदानी यांच्यावर जोरदार टीका

Jalgaon Highway 53 : महिनाभरानंतर 'बायपास'वर एकेरी वाहतूक सुरू, एक बाजू बंदच; दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू होण्यासाठी आणखी किती महिने लागणार?

SCROLL FOR NEXT