अवैध सावकारी
अवैध सावकारी sakal
महाराष्ट्र

अवैध सावकारी करणाऱ्या महिला वकिलाच्या घरी छापा! कोरे चेक अन्‌ हिशेबाची डायरी सापडली

तात्या लांडगे

सोलापूर : अवैध सावकारीतून व्याजाने पैसे घेतलेल्यांना त्रास देणाऱ्या ॲड. गुरुदेवी रेवणसिध्द कुदरी (रा. भवानी पेठ, मड्डी वस्ती) या महिला वकिलाच्या घरी शहर उपनिबंधक कार्यालयातील पथकाने मंगळवारी (ता. २) सकाळी दहा वाजता पोलिस बंदोबस्तात छापा टाकला. त्यावेळी तक्रारदार ॲड. वैयजंती सोमनाथ पाटील (रा. दिंडूर रोड, वळसंग) यांचे तीन कोरे चेक (धनादेश) व इतर कोरे धनादेश आणि एक हिशेबाची वही सापडली. अवैध सावकारीप्रकरणी ॲड. कुदरीविरुध्द जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथील ॲड. वैयजंती पाटील यांनी ॲड. कुदरी यांच्या अवैध सावकारीसंदर्भात शहर उपनिबंधक नागनाथ कंजेरी यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता. त्या अनुषंगाने २२ जुलैला त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. तक्रारीची शहानिशा करून सहकारी उपनिबंधक कार्यालयाने एक पथक तयार केले. त्याचवेळी संशयित आरोपी वकिल असल्याने जोडभावी पेठ पोलिसांचा बंदोबस्तही घेण्यात आला. मंगळवारी (ता. २) या पथकाने पोलिसांच्या मदतीने ॲड. कुदरींच्या घरी अचानक छापा टाकला. सकाळी दहा ते दुपारी अडीचपर्यंत त्याठिकाणी घरझडती सुरु होती. सहकारी उपनिबंधक कार्यालयातील पथकाला त्या घरात अवैध सावकारीच्या अनुषंगाने अनेक दस्तऐवज सापडले आहेत. शहर उपनिबंधक कार्यालयातील विश्वनाथ शिवण्णा नाकेदार यांनी यासंदर्भात जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार ॲड. कुदरीविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक वसंत पवार तपास करीत आहेत.

वॉशरुमचा बहाण्याने ॲड. कुदरी फरार

वकिलीची पदवी घेतलेल्या कुदरी या अवैध खासगी सावकारी करत होत्या. त्याबद्दल तक्रार प्राप्त झाल्यानंतर सहकारी उपनिबंधक कार्यालयाने कुदरीच्या घरी छापा टाकला. त्याठिकाणी आढळलेल्या कागदपत्राचा पंचनामा सुरु होता. त्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी कुदरीला नोटीस पण बजावली. त्यानंतर वॉशरुमला जाण्याचा बहाणा करून ॲड. कुदरी घरातून पसार झाल्या. त्यानंतर त्यांचा फोन बंद होता. त्यासंदर्भात त्यांच्या आई-वडिलांना व भावाला विचारले, पण त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी ‘सीडीआर’ रिपोर्ट काढला असून शोध सुरु असल्याची माहिती जोडभावी पेठ पोलिसांनी दिली.

लाखोंचा हिशोब असलेल्या डायरीत दहाची नोट

ॲड. गुरुदेवी कुदरीच्या घरी सहकार उपनिबंधक कार्यालयातील एस. एस. मालवे, एस. डी. वट्टे, विश्वनाथ नाकेदार यांच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी अधिकाऱ्यांना तेथे कोरे धनादेश, काही कागदपत्रे व एक लाल रंगाची डायरी सापडली. त्या डायरीत शारदा शिंदे, अंबादास कामुनी, रेखा देवकुले, नितेश बनसोडे, सोमनाथ पाटील, ॲड. वैयजंती पाटील यांच्यासह अन्य काहींची नावे आणि त्यापुढे रकमेची नोंद आढळली. ती डायरी जप्त करण्यात आली असून लाखोंचा हिशोब असलेल्या त्या डायरीत दहा रुपयांची नोट ठेवण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT