railway

 
sakal
महाराष्ट्र बातम्या

फुकट्या प्रवाशांना रेल्वेचा दणका! मध्य रेल्वेने ५ महिन्यांत फुकट्यांकडून वसूल केला १०० कोटी रुपयांचा दंड; भुसावळ, मुंबई, नागपूर विभागात सर्वाधिक कारवाई

मध्य रेल्वेने १७.१९ लाख प्रकरणांतील अनधिकृत आणि विनातिकीट प्रवाशांकडून १०० कोटींहून अधिक रुपये दंड म्हणून वसूल केला आहे. सोलापूर विभागात १.०४ लाख प्रकरणांमधून ५.०१ कोटी रुपये दंड रूपाने मिळाले आहेत. आर्थिक वर्ष २०२५-२६ (एप्रिल ते ऑगस्ट २०२५) या कालावधीत हे लक्ष्य रेल्वेने साध्य केले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : मध्य रेल्वेने १७.१९ लाख प्रकरणांतील अनधिकृत आणि विनातिकीट प्रवाशांकडून १०० कोटींहून अधिक रुपये दंड म्हणून वसूल केला आहे. सोलापूर विभागात १.०४ लाख प्रकरणांमधून ५.०१ कोटी रुपये दंड रूपाने मिळाले आहेत. आर्थिक वर्ष २०२५-२६ (एप्रिल ते ऑगस्ट २०२५) या कालावधीत हे लक्ष्य रेल्वेने साध्य केले आहे.

मध्ये रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ (एप्रिल ते ऑगस्ट २०२५) दरम्यान ही कामगिरी केलेली आहे. या काळात, मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी टीमने तिकीटाशिवाय, अयोग्य तिकिटासह किंवा अवैध प्रवास करणाऱ्या १७.१९ लाख प्रवाशांना ताब्यात घेतले आणि १००.५० कोटी विक्रमी दंड वसूल केला आहे. ऑगस्ट २०२५ महिन्यात, मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने २.७६ लाख प्रवाशांना विनातिकीट/वैध तिकिटाशिवाय प्रवास करताना ताब्यात घेतले.

ऑगस्ट २०२४ तुलनेत ही १८ टक्के वाढ आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये विनातिकीट/वैध तिकिटांशिवाय प्रवास करणाऱ्यांकडून १३.७८ कोटी रुपये दंड वसूल केला. ऑगस्ट २०२४ मध्ये या दंडाची रक्कम ८.८५ कोटी रुपये होती. यामुळे ५५ टक्के पेक्षा जास्त वाढ दिसून येते.

विभागनिहाय दंड वसुली

  • भुसावळ विभागात ४.३४ लाख प्रकरणांमधून ३६.९३ कोटी रुपये

  • मुंबई विभागात ७.०३ लाख प्रकरणांमधून २९.१७ कोटी रुपये

  • नागपूर विभागात १.८५ लाख प्रकरणांमधून ११.४४ कोटी रुपये

  • पुणे विभागात १.८९ लाख प्रकरणांमधून १०.४१ कोटी रुपये

  • सोलापूर विभागात १.०४ लाख प्रकरणांमधून ५.०१ कोटी रुपये

  • मुख्यालयात १.०४ लाख प्रकरणांमधून ७.५४ कोटी रुपये

वैध तिकीट खरेदी करून सन्मानपूर्वक आणि जबाबदारीने प्रवास करावा

  • योग्य आणि वैध तिकीट खरेदी करून सन्मानपूर्वक आणि जबाबदारीने प्रवास करावा, जेणेकरून असुविधा आणि दंड टाळता येईल. प्रवाशांना आरामदायी व सन्मानपूर्वक प्रवासी सेवा देण्यासाठी रेल्वे कटिबद्ध आहे.

  • योगेश पाटील, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

Pune Crime : बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून महिलांची फसवणूक; आरोपीकडून १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्टार प्रवाहची नवी मालिका 'बाई तुझा आशीर्वाद'चा प्रोमो समोर; ईशा केसकर नाही 'ही' अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका

Navi Mumbai: पोलिसांचा गुन्हेगारांना दे धक्का! अवैध कारभाराविरुद्ध १४ आरोपींवर गुन्हे दाखल; घणसोलीत धडक कारवाई

Ajit Pawar News: V.K. सिंह यांचं अंडरवर्ल्डशी संबंध, मिटकरींकडे कोणते पुरावे?

SCROLL FOR NEXT