rain sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला

राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे. पावसाच्या दमदार आगमनामुळे सर राज्यातील विविध विभागांमध्ये पावसाची सरासरी व सरासरीपेक्षा जास्त नोंद होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे. पावसाच्या दमदार आगमनामुळे सर राज्यातील विविध विभागांमध्ये पावसाची सरासरी व सरासरीपेक्षा जास्त नोंद होत आहे.

पुणे - राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे. पावसाच्या दमदार आगमनामुळे सर राज्यातील विविध विभागांमध्ये पावसाची सरासरी व सरासरीपेक्षा जास्त नोंद होत आहे. पोषक हवामानामुळे मॉन्सून सक्रिया झाला असून मंगळवारी (ता. १२) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात पावसाच्या जोरदार सरींची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

सोमवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार सरींनी हजेरी लावली होती. उर्वरीत राज्यात बऱ्याच ठिकाणी पावासाची नोंद झाली. तर घाटमाथ्यावरील जोरदार पावसाने नद्या नाले ओसंडून वाहू लागले आहेत. संततधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असलून मंगळवारी (ता. १२) कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा, पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यांना रेड अलर्ट (अतिजोरदार पाऊस) देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, औरंगाबाद, जालना, चंद्रपूर या जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, विदर्भासह राज्याच्या बहुतांश भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

सध्या दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशमधील कमी दाब क्षेत्र सोमवारी (ता. ११) ओडिशाच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरावर सक्रिय होते. तसेच उद्यापर्यंत या कमी दाब क्षेत्राची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात पावसाचा जोर का वाढला ?

हवामानाची स्थिती पाहता, गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मॉन्सूनचा आस दक्षिनेकडे कायम असून पूर्व किनाऱ्यावरील कमी दाबाची वाढणारी तीव्रता. त्यात राज्यावर पूर्व-पश्‍चिम दिशेने वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र. या प्रणालींमुळे राज्यात मॉन्सूनच्या पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून राज्यात सर्वदूर पावसाची स्थिती कायम आहे.

राज्यातील विभागांमध्ये सरासरी व सरासरीपेक्षा जास्त पाऊस -

जून महिन्यात पावसाने सरासरी देखील गाठली नाही. मात्र जुलै महिन्यात ही कसर भरून निघत आहे. हंगामातील पावसात आतापर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला आहे. यामध्ये सर्वाधिक जास्त मराठवाड्यात म्हणजेच सरासरीपेक्षा ४३ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. कोकणात २०, मध्य महाराष्ट्रात ३ तर विदर्भात ८ टक्के जास्त पावसाची नोंद झाली.

विभागनिहाय पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये)

विभाग - सरासरी पाऊस - प्रत्यक्ष पडलेला पाऊस

  • कोकण - १०४०.५ - १२५२.३

  • मध्य महाराष्ट्र - २२९.९ - २३७.९

  • मराठवाडा - १८८.४ - २६९.८

  • विदर्भ - २६६.९ - २८८

राज्यात झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

  • नगर - २

  • कोल्हापूर - १९

  • महाबळेश्‍वर - ७४

  • सांगली - ४

  • सातारा - ११

  • सोलापूर - २

  • मुंबई - ७

  • सांताक्रूझ - ९

  • अलिबाग - ६

  • रत्नागिरी - ७

  • डहाणू - ३५

  • औरंगाबाद - २

  • परभणी - ०.२

  • अकोला - ४

  • अमरावती - ११

  • ब्रम्हपूरी - २७

  • चंद्रपूर - १८

  • गोंदिया - ८

  • नागपूर - ४०

  • वर्धा - ७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT