Koyna Dam esakal
महाराष्ट्र बातम्या

Koyna Dam Update : कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृह केंद्राचा दरवाजा आज उघडणार; नदीकाठच्या गावांना इशारा

कोयना धरणात (Koyna Dam) ६२.४१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली असून, साडेतीन टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

पाटण : कोयना धरणात (Koyna Dam) ६२.४१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्याने आज (ता. २७) दुपारी चार वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातील दुसरे युनिट सुरू करण्यात येणार आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे सध्या एक युनिट कार्यान्वित असून, कोयना नदीमध्ये (Koyna River) एक हजार ५० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.

दुसरे युनिट सुरू केल्यास कोयना नदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्ग २१०० क्युसेक होईल, असे कोयना धरण व्यवस्थापनाने जाहीर केले आहे. गेल्या २४ तासांत कोयनानगर व महाबळेश्‍वरला १२४ मिलिमीटर आणि नवजाला १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, जलाशयात प्रतिसेकंद ४२ हजार ६६९ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

धरणाचा एकूण पाणीसाठा ६२.४१ टीएमसी झाला असून, कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर आज थोडा कमी झाला आहे. मात्र, संततधार कायम आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली असून, साडेतीन टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT