Raj Kundra Pornography Case
Raj Kundra Pornography Case  esakal
महाराष्ट्र

Raj Kundra: मला पॉर्न प्रकरणात गोवलं; मुंबई क्राईम ब्रान्चमधील वरिष्ठांविरुद्ध कुंद्राची CBI कडे तक्रार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई क्राईम ब्रान्चमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला पॉर्नोग्राफी प्रकरणात गोवलं होतं अशा दावा बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राने सीबीआयला केलेल्या तक्रारीत केला आहे. तसेच, कुंद्राने आपल्या तक्रारीत असाही दावा केला आहे की, आपल्याविरुद्धचा हा संपूर्ण खटला एका व्यावसायिकाने त्याच्या वैयक्तिक सूडबुद्धीने रचला होता.(Raj Kundra Pornography Case i was implicated in porn case by senior officers of mumbai crime )

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा उद्योगपती राज कुंद्रा गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. राज कुंद्राचे नाव पॉर्नोग्राफी प्रकरणात आल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडालेली पहायला मिळाली. शिल्पा शेट्टी आणि त्यांच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं. अशातच आता राज कुंद्राने पॉर्न प्रकरणातून सुटल्यानंतर एका वर्षानंतर आपले मौन सोडलं आहे.

आपल्याविरुद्धचा हा संपूर्ण खटला हा एका प्रतिस्पर्धी व्यावसायिकाने वैयक्तिक सूडबुद्धीने तयार केला होता. यासाठी त्याने मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने आपल्याला कथित पॉर्नोग्राफी रॅकेटच्या खोट्या प्रकरणात अडकवलं आणि अटक केली. असल्याचे कुंद्राने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

काय म्हटलं आहे तक्रारीमध्ये?

आपल्याविरुद्धचा हा संपूर्ण खटला हा एका प्रतिस्पर्धी व्यावसायिकाने वैयक्तिक सूडबुद्धीने तयार केला होता. यासाठी त्याने मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने आपल्याला कथित पॉर्नोग्राफी रॅकेटच्या खोट्या प्रकरणात अडकवलं आणि अटक केली. तसेच, माझ्याविरुद्ध दाखल केलेल्या प्रकरणाचा सीबीआयने पुन्हा तपास करावा, जेणेकरुन मला न्याय मिळेल, अशी मागणीदेखील राज कुंद्राने केली आहे. कुंद्राने आपल्या तक्रारीत काही अधिकाऱ्यांची नावंही लिहिली असून ते पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पाठवलं असल्याची माहिती समोर आलं आहे.

ज्या व्यावसायिकाच्या सांगण्यानुसार मला या प्रकरणात गोवण्यात आलं होतं त्याचे पोलिसांशी जवळचे संबंध होते. काही पोलिसांनी आपला काळा पैसा त्या व्यावसायिकाकडे गुंतवल्याचा आरोपही कुंद्राने तक्रारीत केला आहे. त्याने पुढे लिहिलं आहे की, "मी एक वर्ष गप्प बसलो आणि मीडिया ट्रायलमुळे मी 63 दिवस आर्थर रोड जेलमध्ये घालवले आहेत. मला न्यायालयाकडून न्याय हवा आहे, जो मला मिळेल, हे मला माहित आहे, या अधिकाऱ्यांच्या विरोधात मी चौकशीची विनंती करत असल्याचे कुंद्राने म्हटलं आहे.

आपला पॉर्नोग्राफीच्या निर्मितीशी काहीही संबंध नाही किंवा त्यांनी त्यातून कोणतेही पैसे कमावले नाहीत. हॉटशॉट अॅप माझ्या मेहुण्याचं होतं आणि ते अॅप अश्लील नव्हते, असं राज कुंद्राकडून सातत्याने सांगितलं जात होते.. तसंच ज्यावर ओटीटी अॅप चालू शकतात फक्त तेच सॉफ्टवेअर त्याच्या कंपनीने दिलं होतं. पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कोणत्याही आरोपींशी आपला काहीही संबंध नाही. मुंबई पोलिसांनी 17 अॅप्सविरोधात एफआयआर दाखल केला होता, मात्र इतर कोणालाही हायलाईट करण्यात आलं नाही, केवळ यातून बदनामी केली गेली," असा दावाही कुंद्राने केला आहे.

राज कुंद्राने आपल्या तक्रारीत मुंबई क्राईम ब्रान्चमधील काही अधिकार्‍यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात दाखल केलेल्या पहिल्या चार हजार पानांच्या आरोपपत्रात आपलं नाव नसतानाही, पोलिसांनी आपल्याला या प्रकरणात अडकवण्यासाठी सर्व काही केलं. या खटल्यातील प्रत्येक साक्षीदारावर आपल्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, असा उल्लेख राज कुंद्राने तक्रारीत केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT