Raj Thackeray Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नाही - राज ठाकरे

राज ठाकरे हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.

सुधीर काकडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आगामी काळातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचं काम ते या दौऱ्यातून करत असल्याचं दिसतं आहे. राज ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये (Aurangabad) पत्रकारांशी संवाद साधत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नसल्याचं सांगितलं.

राज्याची प्रकृती ठीक नाही, त्याला कारण राज्याला तीन डॉक्टर आहे असं म्हणत त्यांनी पेपरफुटी आणि ओबीसी आरक्षणावरून चिंता व्यक्त केली. तसेच राज्यात जे सरकार आहे ते सध्या पडेल असं वाटत नसल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना़ राज्यातील आणि देशातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. मुळ विषय बाजूला ठेवून, इतर विषय दाखवले जातात. माध्यमांचाही वापर केला जातो, त्यातून आर्यन खान प्रकरण, वाझे सारखे प्रकरण दाखवले जातात मात्र, पाच लाख व्यावसायिकांनी देश सोडल्याचा कोणीही शोध घेत नाहीत. त्यामुळे किती रोजगारांवर परिणाम होतो हे कुणी बघत नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Crisis : मुंबईवर अभूतपूर्व पाणी संकट ! जलाशयांत केवळ १० टक्के पाणीसाठा; बांधकाम, जलतरणचा पाणीपुरवठा आजपासून बंद

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

PM Kisan 23rd Installment: 23व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली! 2,000 रुपये कधी खात्यात येणार? थेट कृषिमंत्र्यांनीच सांगितली तारीख

SC Reservation Subclassification : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत एक लाखांहून अधिक हरकती, सरकार घाईगडबडीत निर्णय घेणार नाही; मंत्री शिरसाट यांची ग्वाही

Satara Accident: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचे स्वप्न अधुरे! बनपुरीजवळ दुचाकी-पिकअपची समोरासमोर धडक; १६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT