Raj Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : "शिवसेनेची धुरा तुमच्या हातात असती तर..." अमृता फडणवीसांच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर

Sandip Kapde

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी रोखठोक उत्तरे दिले. मी भाजपचे प्रितिनिधित्व करत नाही, हे अमृता फडणवीस यांनी आधी स्पष्ट केले. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यात राज ठाकरे बोलत होते.

शिवसेनेची धुरा राज ठाकरेंच्या हातात असती तर शिवसेनेची ही अवस्था कधीच झाली नसती, या अमृता फडणवीसांच्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी उत्तर दिले.

हा विषय मी सोडला आहे. या विषयांना काही अर्थ नाही. जे झालं ते सर्वांच्या समोर आहे. मी माझ्या स्वत:चा पक्ष काढला तो मला पुढे न्यायचा आहे. जे सांभाळत आहेत ते सांभाळतील, असे राज ठाकरे म्हणाले.

यावेळी राज ठाकरे यांनी एक उदाहरण सांगितले. एकदा हेलिकॉप्टर, विमान आणि रॉकेट तिघेजण बसलेले असतात. हेलिकॉप्टर म्हणते वरच्या फिरणाऱ्या पंख्याने मला डोकेदुखी होते. विमान म्हणते उंचावरुन उडताना मला सर्दी होते. बाजूला रॉकेट बसलेले असते. ते काही बोलत नाही. त्याला विचारतात तू काही बोलत नाहीस. यावर रॉकेट म्हणते काय बोलाव ज्याची जळते त्याला कळते, असा विनोद राज ठाकरे यांनी सांगितला.

त्यामुळे मी माझा पक्ष स्थापन केला, माझे हाल मी बघतोय अजून कोणत्या पक्षाची धुरा मला सांभळायची नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

Sachin Tendulkar: विनोद कांबळी सचिनपेक्षा खरंच भारी होता? भावानेच केला खुलासा; म्हणाला, 'तो असं कधीच...'

Dr. Trupti Agarwal: 'मुलं म्हणजे रिपोर्ट कार्ड नव्हे,' डॉ. त्रुप्ती अगरवाल यांचं नवं शैक्षणिक सूत्र

ST Bus conductor drunk : एसटी बसचा कंडक्टर दारूच्या नशेत धुंद; केबिनजवळ जाताच ड्रायव्हरनं...; पाहा VIDEO

Rain-Maharashtra Latest Live News Update: सीएसडीएसचे संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT