महाराष्ट्र बातम्या

अंबानींसाठी भाजपने देशच विकायला काढलाय : राज ठाकरे

सकाळवृत्तसेवा

मुंबई : अवनी वाघिणीला वादग्रस्तरित्या ठार मारण्याच्या सरकारच्या कृत्यावर टीकेचा भडीमार सुरू असताना आज (बुधवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या वादात उडी घेतली. 'अवनीला ठार मारण्याऐवजी बेशुद्ध करायला हवं होतं', असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. 

मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य केले. अवनीला ठार केल्यामुळे मुनगंटीवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याशी मुनगंटीवार यांचे जाहीर वादही झाले. 

या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे म्हणाले, 'या प्रकरणी मुनगंटीवार बेजबाबदार वक्तव्ये करत आहेत. मुनगंटीवार वनमंत्री आहेत, म्हणजे त्यांना जंगलातलं काही कळतं, असं नाही. त्यांचं वनमंत्रिपद उद्याही जाऊ शकतं. त्या वाघिणीला ठार मारण्याची गरज नव्हती. तिला बेशुद्ध करण्याची गरज होती. अवनीला ठार केल्यानंतर तिचे दोन बछडे अनाथ झाले. त्यामुळे तो एक जीव घेतल्यानंतर उरलेल्या दोन जिवांनाही धोक्‍यात घातल्यासारखं झालं आहे.'' 

'भाजपच्या सरकारला सत्तेचा माज आला आहे. 'आम्ही काहीही केलं, तरीही सहन केलं जातं' अशी त्यांची मानसिकता झाली आहे. घोडा मैदान आता जवळच आहे. लवकरच कळेल त्यांना! जिथे अवनीला ठार मारले, तिथेच सरकार अनिल अंबानी यांना जागा देणार असल्याचे सांगितले जात आहे. अंबानींसाठी सरकारने आख्खा देशच विकायला काढला आहे. फक्त पुतळे उभे करून वाघांचे संवर्धन होत नसते', अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या निर्णयांवर टीका केली. 

मुनगंटीवार यांना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा
केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी राज्य सरकारवर टीका केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखण केली. 'अवनीला ठार करण्याचा निर्णय योग्यच होता. या प्रकरणी मुनगंटीवार यांचा राजीनामा मागणे चुकीचे आहे', अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी वनमंत्र्यांना पाठिंबा दिला. दरम्यान, या प्रकरणावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेण्याचे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे अवनीला ठार करण्याचा मुद्दा राजकीय मैदानावर अधिक तापण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे रुग्णालयात तरीही 'ऑपरेशन टायगर'; ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील शिंदे सेनेत

Supreme Court: पती दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये? पत्नीने मागितले कॉल रेकॉर्ड; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi Live Update: वर्गात शिकत असताना साप शिरला; विद्यार्थ्यांमध्ये घबराट

Anjanari Ghat Accident : काळजाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात! आंजणारी घाटात ट्रेलरचा चक्काचूर; लोखंडी पत्र्यात अडकलेल्या चालकाला पोलिसांनी कसं वाचवलं?

White Mongoose VIDEO : कोकणात निसर्गाचा चमत्कार! चिपळूणमध्ये आढळले दुर्मीळ 'पांढरे मुंगूस'; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, काय आहे पांढऱ्या रंगामागचं कारण?

SCROLL FOR NEXT