Raj Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray: तपासणीसाठी आलेल्या पोलिसांच्या श्वानाचे राज ठाकरेंनी पुरवले लाड; व्हिडीओ व्हायरल

राज ठाकरेंचं श्वानप्रेम महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर रवाना झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी राज ठाकरे दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्याच्या दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. यामधून त्यांचं श्वानप्रेम पुन्हा एकदा दिसून आलं आहे.

राज ठाकरे ट्रेनने विदर्भ दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी विदर्भ एक्सप्रेसमध्ये सुरक्षा तपासणीसाठी पोलीस आपल्या दलातल्या लॅब्राडोर जातीच्या कुत्र्यासह आले होते. यावेळी त्या कुत्र्याला राज ठाकरे यांनी आपल्या जवळ बसवून घेतलं. तसंच पोलिसांकडे या कुत्र्याची चौकशीही केली. त्याला आराम मिळतो ना, जेवण वेळेत दिलं जातं ना, अशी चौकशीही राज ठाकरेंनी केली. शिवाय या कुत्र्याची काळजी घेताना काय करावं, काय करू नये याबद्दलही राज ठाकरेंनी थोडक्यात सूचना दिली.

राज ठाकरेंचं श्वानप्रेम सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यांच्या घरात त्यांचा लाडका जेम्स नावाचा कुत्रा होता. जेम्सच्या निधनानंतर आता त्यांच्याकडे मुफासा आणि ब्लू असे दोन कुत्रे आहेत. जेम्सच्या निधनानंतर राज ठाकरेंनी स्वतः स्मशानभूमीत जाऊन त्या कुत्र्यावर अंत्यसंस्कार करत त्याला निरोप दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat Canada Visit : भारत 'महाशक्ती' की ‘विश्वगुरू’ ? कॅनडातील भाषणात मोहन भागवतांनी सांगितला भारतीय विचार

Nepal Flood: नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलयाचा धोका! भोटेकोसी नदी फुगली; ७८८ मृत्यू, तीन हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर फडणवीसांचा मोठा संकेत; ‘चर्चेची दारे खुली, कायदेशीर चौकटीत तोडगा काढू’

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज; 'या' तीन जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा

Panchganga River Incident : रक्षाबंधनाची राखी हातात अन्... बहिणीच्या डोळ्यांदेखतच भावाने पंचगंगा नदीत मारली उडी; रुई पुलावर थरार

SCROLL FOR NEXT