Raj Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : विरोधी पक्षांनी हुरळून जाऊ नये ; राज ठाकरे

‘‘लोकसभेत लोकांनी सरकारवर राग म्हणून विरोधी मतदान केले. पण याचा अर्थ लोकांचे आपल्यावर प्रेम आहे, असा शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी काढू नये. विरोधी पक्षांनी फार हुरळून जाऊ नये.

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : ‘‘लोकसभेत लोकांनी सरकारवर राग म्हणून विरोधी मतदान केले. पण याचा अर्थ लोकांचे आपल्यावर प्रेम आहे, असा शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी काढू नये. विरोधी पक्षांनी फार हुरळून जाऊ नये. जनतेच्या रागाची ती वाफ आता निघून गेली आहे. त्यामुळे आता विधानसभेत वेगळे चित्र असेल,’’ असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी येथे केले.

ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून गुरुवारी गडचिरोली येथील सर्किट हाऊस विश्रामगृहात त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत जिल्ह्यातील पक्षस्थिती जाणून घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना ते म्हणाले की, लोक अशा योजनांना भुलत नाही. ते लाभ नक्की घेतात. पण मत ज्यांना द्यायचे त्यांनाच देतात.

‘‘सध्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. अशा घटना पुढे घडू नये यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. दिवंगत आर. आर. पाटील राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ कायदा आणला

आणि कठोरपणे राबवला. त्याचे सकारात्मक परिणाम मिळाले. अशा धडाडीने काम व्हायला हवे,’’ असे राज ठाकरे म्हणाले.

रोडे व भोयर यांना उमेदवारी

दरम्यान राज ठाकरे यांनी आज चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून मनदीप रोडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सचिन भोयर यांना राजुरातून तिकीट दिले आहे. मनसेने जाहीर केलेले अन्य उमेदवार ः बाळा नांदगावकर ( शिवडी, मुंबई), दिलीप धोत्रे (पंढरपूर), संतोष नागरगोजे (लातूर ग्रामीण), बंडू कुटे (हिंगोली).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT