Raj Thackeray Uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : 'एकदा उद्धव ठाकरेंना घेऊन ओबेरॉय हॉटेलमध्ये गेलो...' राज यांनी सांगितली आपबिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेतून लोक कसे बाहेर पडले यावर भाष्य केलं. आपण शिवसेनेत असतांना नेहमीच्या जाचाला वैतागून काय तो सोक्षमोक्ष लावायचं ठरवलं... असं म्हणून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत शेवटची चर्चा झाल्याचं नमूद केलं.

राज ठाकरे म्हणाले की, एके दिवशी उद्धवला म्हणालो, चल बाहेर जायचं आहे. हॉटेल ओबेरॉयला आम्ही गेलो. शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो, खोटं नाही बोलत. मी उद्धवला म्हणालो- बोल तुला काय हवंय? पक्षाचा प्रमुख व्हायचंय तर हो, सत्ता आली तर मुख्यमंत्री व्हायचंय- हो. परंतु मला माझं काम काय ते सांग? मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नका.

हेही वाचाः झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

'मला म्हणाला, मला काही प्रॉब्लेम नाही. मी म्हणालो ठरलं मग. हो ठरलं. नक्की ना म्हणाला हो नक्की! घरी आल्यानंतर बाळासाहेबांना भेटलो. सगळं मिटवलं असं सांगितलं. बाळासाहेबांनी मला मिठी मारली. मला म्हणाले, उद्धवला बोलाव. परंतु बोलावूनही उद्धव आला नाही. बाळासाहेब म्हणाले, अरे बोलवा. मी बाहेर जावून विचारलं, मला सांगण्यात आले ते निघून गेले आहेत.'

या सगळ्या गोष्टी मला बाहेर काढण्यासाठी सुरु होत्या. असं म्हणून राज यांनी नारायण राणे शिवसेनेबाहेर गेल्याचा किस्सा सांगितला. अशाच प्रकारे त्रास देऊन नेत्यांना पक्षाबाहेर काढल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.

दर्ग्यावरुन सरकारला इशारा

राज ठाकरे म्हणाले की, मुंबईच्या समुद्रात अनधिकृतरित्या झेंडे लावले जात आहेत. माहीम पोलिस स्टेशन जवळ आहे पण लक्ष नाही. महानगरपालिकेचे लोक तिथे जातात, परंतु बघितलं जात नाही. समुद्रात नवीन हाजी अली करणार असाल तर याद राखा. प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त यांना मी आजच सांगतो महिन्याभराच्या आत कारवाई झाली नाही, ते तोडलं गेलं नाही तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपती मंदिर उभारल्याशिवाय राहणार नाही.

मग काय व्हायचंय ते होऊन जावू दे. सगळ्यांकडून दुर्लक्ष करीत असाल तर आमच्याकडेही दुर्लक्ष करा. तुम्हाला सांगतो, हे राज्य माझ्या हातात आलं तर सुतासारखं सरळ करेन, असं म्हणून त्यांनी इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT