Raj Thackeray
Raj Thackeray esakal
महाराष्ट्र

Raj Thackeray : माहीमच्या दर्ग्यावरुन राज ठाकरेंचा सरकारला अल्टिमेटम; तर तिथे मंदिर...

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी सरकारला आणि प्रशासनाला एक अल्टिमेटम दिला आहे. मुंबईच्या समुद्रात होत असलेल्या अतिक्रमणाचा एक व्हीडिओ राज ठाकरेंनी यावेळी दाखवला.

माहीमच्या मगदूम बाबाच्या दर्ग्यासमोर अनधिकृतरित्या झेंडे लावून अतिक्रमण होत आहे. ते थांबवलं नाही तर आम्हीही तेथे मंदिर बांधू, असा इशारा त्यांनी दिला.

काय म्हणाले राज ठाकरे?

मुंबईच्या समुद्रात अनधिकृतरित्या झेंडे लावले जात आहेत. माहीम पोलिस स्टेशन जवळ आहे पण लक्ष नाही. महानगरपालिकेचे लोक तिथे जातात, परंतु बघितलं जात नाही. समुद्रात नवीन हाजी अली करणार असाल तर याद राखा. प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त यांना मी आजच सांगतो महिन्याभराच्या आत कारवाई झाली नाही, ते तोडलं गेलं नाही तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपती मंदिर उभारल्याशिवाय राहणार नाही. मग काय व्हायचंय ते होऊन जावू दे. सगळ्यांकडू दुर्लक्ष करीत असाल तर आमच्याकडेही दुर्लक्ष करा. तुम्हाला सांगतो, हे राज्य माझ्या हातात आलं तर सुतासारखं सरळ करेन, असं म्हणून त्यांनी इशारा दिला आहे.

नारायण राणे शिवसेनेबाहेर गेलेच नसते...

  • शिवसेनाप्रमुखपद एकाला झेपलं नाही दुसऱ्याला झेपेल की नाही, माहिती नाही.

    • त्यांच्या बाजूच्या लोकांना आत्ताच सांगतो. माझं बोलणं झाल्यावर तोंड उचकटू नका.

    • धनुष्यबाण फक्त बाळासाहेबांनाच झेपू शकतो

    • नारायण राणे बाहेर गेलेच नसते. मी फोन करुन विचारलं हे काय करताय?

    • जावू नका. ते म्हणाले बोला बाळासाहेबांशी.

    • मी बोललो. बाळासाहेब म्हणाले घरी घेऊन ये.

    • नंतर बाळासाहेब बोलले त्यांना नको बोलावू. मागे कोणतरी बोलत होतं हे मला ऐकू येत होतं.

    • अशा प्रकारे लोकांना बाहेर काढणं चालू होतं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT