Raju Shetti Shivanand Patil Sugarcane Rate esakal
महाराष्ट्र बातम्या

'आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेला चांगला दर, उसाला 400 रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता द्या'; राजू शेट्टींची साखरमंत्र्यांकडं मागणी

राज्यातील साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाईन करणे गरजेचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

मंत्री शिवांनद पाटील यांनी, शिष्टमंडळासमवेत सकारात्मक चर्चा करत राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

विजापूर : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेला चांगला दर असल्याने कर्नाटक राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४०० रुपयाप्रमाणे दुसरा हप्ता देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे.

यासंदर्भात विजापूर येथे कर्नाटक राज्याचे साखरमंत्री शिवानंद पाटील (Shivanand Patil) यांच्यासमवेत बैठक झाली. त्यावेळी माजी खासदार शेट्टी बोलत होते. बैठकीत, ४०० रुपयाप्रमाणे दुसरा हप्ता, कर्नाटक राज्यातील वजनकाटे ऑनलाईन करणे व महाराष्ट्र सरकारप्रमाणे कर्नाटक सरकारनेही फसवणूक केलेल्या उसतोडणी मुकादमावर कारवाई करण्यासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी साखरमंत्री पाटील यांनी, कर्नाटक राज्यातील ऊस उत्पादक व वाहतूकदार यांच्या प्रश्नांबाबत तातडीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याबाबत प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. माजी खासदार शेट्टी यांनी, गेल्या वर्षभरात साखरेला व उपपदार्थाला चांगला दर मिळाला आहे.

कर्नाटक सरकारने गेल्यावर्षी इथेनॅाल उत्पादन करणाऱ्या कारखान्यांनी प्रतिटन १५० रुपये व इतर कारखान्यांनी प्रतिटन १०० रुपये एफआरपीपेक्षा जादा दर द्यावा, असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.

कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांमध्ये काटामारीचे प्रमाण जास्त असून राज्यातील साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाईन करणे गरजेचे आहे. याबरोबरच कर्नाटक राज्यातील ऊस तोडणी मजूर मुकादमांकडूनही मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. महाराष्ट्र सरकारने नोडल अधिकारी म्हणून आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडून संबंधित फसवणूक केलेल्या मुकादमांवर गुन्हे दाखल करण्याबाबत पोलिस प्रशासनाला आदेश दिले जात आहेत.

त्याचप्रमाणे कर्नाटक सरकारनेही कार्यवाही करावी, अशी मागणी माजी खासदार शेट्टी यांनी केली. यावेळी सावकर मदनाईक, राजेंद्र गड्यान्नावर, संदीप राजोबा, तात्या बसण्णावर, गणेश इळेगेर, बाबुराव पाटील आदींसह बेळगाव, चिक्कोडी, रायबाग, विजापूर, बागलकोट या जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सकारात्मक चर्चा

मंत्री शिवांनद पाटील यांनी, शिष्टमंडळासमवेत सकारात्मक चर्चा करत राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कर्नाटक सरकारने गेल्यावर्षीच कारखान्यांना एफआरपीपेक्षा जादा दर देण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच याबाबत न्यायालयातही सरकारच्या बाजूने निकाल लागेल. त्याची अंमलबाजावणी करण्यास साखर कारखानदारांना भाग पाडणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT