Raju Shetty esakal
महाराष्ट्र बातम्या

Raju Shetty : वीज दरवाढ व शेतीमालाच्या प्रश्नावर राज्यभरात चक्का जाम आंदोलन

वीज दरवाढ व शेतीमालाच्या प्रश्नावर राज्यभरात बुधवारी (ता.२२) चक्का जाम आंदोलन केले जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज पत्रपरिषदेत दिली.

सकाळ वृत्तसेवा

वीज दरवाढ व शेतीमालाच्या प्रश्नावर राज्यभरात बुधवारी (ता.२२) चक्का जाम आंदोलन केले जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज पत्रपरिषदेत दिली.

सोलापूर - वीज दरवाढ व शेतीमालाच्या प्रश्नावर राज्यभरात बुधवारी (ता.२२) चक्का जाम आंदोलन केले जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज पत्रपरिषदेत दिली. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते.

राज्यभरातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न समोर आले आहेत. मराठवाडा व विदर्भात कापूस पिकांच्या संदर्भात शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सोलापूर भागात कांदा उत्पादकांच्या मालाला भाव न मिळाल्याने त्यांच्या अडचणी झाल्या आहेत. या शिवाय महावितरण व महापारेषण या कंपन्यांनी शेतकऱ्यांवर ३७ टक्के वीजदरवाढ लादण्याची तयारी केली आहे. शेतीसाठी दिवसा वीज न देणे हा ही एक प्रकारचा अन्याय सुरु आहे. पीक विमा व अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या बाबतीत शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे.

सुरत-चेन्नई महामार्ग व रिंगरोडसाठी शासन कवडी मोल भावाने जमीनी भूसंपादीत करत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला दिला जात नाही. या सारख्या सर्वच प्रश्नांवर शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. या प्रश्नी बुधवारी (ता.२२) ला राज्यभरात दुपारी बारा वाजल्यानंतर चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.

बारावीच्या परीक्षांचे नुकसान नाही

बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांचे आंदोलनाने काही नुकसान होऊ नये यासाठी दुपारी बारा नंतर चक्का जाम केला जाईल. तसेच पोलिसांनी आंदोलनाला सहकार्य केले तर ठीकच नसता आमच्या पद्धतीने आंदोलन केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत; शरद पवारांनी स्पष्टच फेटाळली चर्चा, दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्रच

मोठी बातमी! सोलापुरातील १५ ऑर्केस्ट्रा बार अन् १४ कला केंद्रांना लागणार कायमचे कुलूप; सोलापूर पोलिसांनी मागवली माहिती; गृह विभागाचा नेमका आदेश काय? वाचा...

Pumpkin Jowar Idli: कमी तेल, भरपूर पोषण! नाश्त्यासाठी झटपट बनवा गरमागरम 'भोपळा-ज्वारी इडली'

आजचे राशिभविष्य - २९ जुलै २०२६

NEET Paper Leak: 'नीट पेपर लीक' प्रकरणात सीबीआयकडून चार्जशीट दाखल; शिवराज मोटेगावकरसह 13 आरोपींचा समावेश

SCROLL FOR NEXT