raju shetti sakal
महाराष्ट्र बातम्या

आघाडीच्या नेत्यांचे 'दिवाळीत' काळे झेंडे दाखवून स्वागत: राजू शेट्टी

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचा केसाने गळा कापला आहे. राज्यसरकारने आश्वासन दिलं, पण पुरेशी मदत मिळाली नाही. या दिवाळीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना काळे झेंडे दाखवून स्वागत करा असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी शेतकऱ्यांना दिला. स्वाभिमानीच्या 20व्या ऊस परिषदेत ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले, मराठवाड्यात पावसानं मोठं नुकसान झालं. पण पुरेशी मदत मिळाली नाही. सरकार फक्त आश्वासन देत प्रत्यक्ष मात्र, मदत काहीच करत नाही. यंदा महाविकास आघाडीतील नेत्यांची दिवाळी गोड होऊ देणार नाही. असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

जर सरकारकडे खरोखरच पैसे नव्हते तर त्याच काळामध्ये सरकारने सरकारी नोकरांना ११ टक्के महागाई भत्ता रोखीने कसा दिला. या प्रश्नाचे उत्तर मला हवा आहे. ज्या शेतकऱ्याने तुमच्यावर विश्वास ठेवला त्याच शेतकऱ्यांचा तुम्ही विश्वास घात केला आहे. हे राज्य शेतकऱ्यांसाठी बनवतो असे शरद पवार साताऱ्यामध्ये भरपावसात बोलले होते. तुमचे शब्द आठवण करून द्यावेत म्हणून मी आता आठवण करून दिली. सगळ्यांच्या दारी जाऊन आलो सरकारला इशाराही दिला. पण काहीच उपयोग झाला नाही. दसऱ्याला आमचा शिमगा केलाय तुमचा दिवाळीला शिमगा केल्याशिवाय राहणार नाही. अशी तिखट प्रतीक्रिया शेट्टींनी दिली.

गुंट्याला 135 रुपये सरकार देणार आहे असे मी वारंवार सांगत होतो. त्यात 15 रुपये वाढ करून 150 रुपये केले. मराठवाड्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, यांनाही अपेक्षित मदत मिळालेली नाही. एफआरपी चे तुकडे करण्यात केंद्राचा हात आहे. आता आम्ही गप्प बसणार नाही. या दिवाळीला महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचे हातात काळे झेंडे घेऊन स्वागत करा अशी विनंती राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केली. सरकार भरीव मदत करणार आहे तर तुम्ही आंदोलन कशाला करता असा सल्ला महाविकास आघाडीतील नेत्यांनी दिला होता. अशी माहितीही त्यांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, दुष्काळासंदर्भात केल्या १७ मागण्या

Premanand Maharaj Disciple Death : आश्रमाच्या छतावरून खाली पडले अन् मृत्यू; प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ कायम

Competitive Exam Success Story: जिद्द, चिकाटी अन् मेहनतीला यशाची साथ; तीन माजी विद्यार्थ्यांची यशाला गवसणी, जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीचा महापराक्रम! तेंडुलकरनंतर वन डेत असा विक्रम नोंदवणारा पहिलाच; शुभमन गिलचेही शतक

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

SCROLL FOR NEXT