Rajya Sabha Election ED oppose to nawab malik anil deshmukh voting for rajya sabha  
महाराष्ट्र बातम्या

'माविआ'चं टेन्शन वाढलं; देशमुख, मलिकांच्या मतदानाला ईडीचा विरोध

सकाळ डिजिटल टीम

सध्या राज्यसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यादरम्यान १० तारखेला होणाऱ्या या निवडणुकीसाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता यावे यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून अर्ज करण्यात आला होता, दरम्यान आज ईडीकडून या अर्जाला कोर्टात उत्तर देण्यात आले आहे. या उत्तरानंतर माविआ सरकारचे टेन्शन वाढले आहे. (Rajya Sabha Election ED oppose to nawab malik anil deshmukh voting for rajya sabha)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे सध्या अटकेत आहेत या दोन नेत्यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी परवानगी मागणारा अर्ज पक्षाकडून करण्यात आला होता. दरम्यान अर्जाला ईडीने विरोध केला आहे. ईडीच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारचे टेन्शन वाढले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत सध्या एक-एका मतासाठी घोडेबाजार सुरू असताना, राष्ट्रवादीला त्यांची दोन महत्वाची मते यामुळे गमवावी लागू शकतात. दरम्यान सगळ्या प्रकरणावर मुंबई सत्र न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे टेन्शन वाढलंय...

राज्यसभेच्या निवडणुकीत मतांसाठी रस्सीखेच सुरू आहे. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छोटे घटक पक्ष आणि अपक्ष आमदरांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. समाजवादी पार्टीनं देखील यासंदर्भात मुख्यमंत्र्‍यांना पत्र लिहिले आहे. सपाने गेल्या अडिच वर्षांमध्ये मुस्लिमांसाठी काय केलं याचा लेखाजोखा मागीतला आहे, या पत्राला उत्तर मिळाल्यानंतर आपण मतदानाचा विचार करु असं, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी म्हटलं आहे. यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT