MLA Mahesh Shinde
MLA Mahesh Shinde esakal
महाराष्ट्र

कोरेगावात बंडखोर आमदार महेश शिंदे समर्थकांचं जोरदार शक्तीप्रदर्शन

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी 30 आमदारांसह बंड पुकारलंय.

सातारा : राज्यात निर्माण झालेल्या संघर्षानंतर आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांनी घेतलेल्या भूमिकेच्या समर्थनार्थ कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीनं कोरेगाव (Koregaon) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मेळाव्याचं आयोजन करण्‍यात आलं. या मेळाव्यात महेश शिंदेंच्या समर्थनार्थ ‘तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है’ची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तुम्ही जो निर्णय घ्याल, त्याच्या पाठीशी आपण ठामपणे आहोत, अशी ग्वाहीदेखील देण्यात आली.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ३० आमदारांसह बंड पुकारलं आहे. हे सर्व आमदार सध्या गुहाटीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झाले आहे. शिवसेनेत (Shiv Sena) दोन गट पडल्यामुळं स्थानिक शिवसैनिक एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पाठीशी असल्याचे सांगत एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. तर, बंडखोर आमदारांच्या समर्थकांनीही आपल्या नेत्यांच्या बाजूनं आपली ताकद असल्याचं दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

Maharashtra Politics crisis

एकनाथ शिंदेंच्या बंडात सातारा जिल्ह्यातील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा समावेश आहे. आज कोरेगावात आमदार महेश शिंदेंच्या समर्थकांनी पाठींबा दर्शवण्यासाठी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. तसेच महेश शिंदेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तसेच यावेळी मेळाव्याच्या माध्यमातून आमदार महेश शिंदेंनी कोरेगाव मतदारसंघात (Koregaon Constituency) केलेल्या कामांची माहिती व कोरोना काळात केलेल्या कामाची माहिती दिली. तसेच सर्व समर्थकांनी आमदार महेश शिंदेंच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT