Ram Kadam On Uddhav Thackeray
Ram Kadam On Uddhav Thackeray 
महाराष्ट्र

Ram Kadam On Uddhav Thackeray: "तर मी राजकीय संन्यास घेणार", राम कदम उद्धव ठाकरेंना देणार वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट

Sandip Kapde

Ram Kadam On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. आज कष्टाळू माजी मुख्यमंत्र्यांचा वाढदीवस आहे.  त्यांना आम्ही मराठी शब्दकोश भेट देणार आहोत, असा टोला कदम यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे नेहमी तेच-तेच शब्द वापरात आहेत. त्यामुळे त्याच-त्याच शब्दांचा वापर त्यांनी करू नये. त्यांनी आम्ही भेट दिलेल्या शब्दकोषाचा वापर करावा, असे देखील राम कदम म्हणाले

राम कदम म्हणाले, उद्धव ठाकरे हे आयत्या रेघोट्या ओढणारे आहेत. ते बिल्डर धार्जिणे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे आणि मंगलप्रभात लोढा यांच्यावर टीका करण्याचा काही अर्थ नाही

आमचे पालकमत्री मंगलप्रभात लोढा यांनी एका तरी बिल्डरचा फायदा करून दिला अस असेल तर त्याचे तुम्ही पुरावे द्या आणि असं काही असेल तर मी राजकीय संन्यास घेईन, असे आव्हान राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे. (Ram Kadam On Uddhav Thackeray) 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

मुंबईची स्वायत्तता भाजपला मारायची आहे. त्यांना मुंबई शिवसेनेकडून हिसकवायची नाही तर मुंबई आपल्या अंगठ्याखाली ठेवायची आणि त्यासाठीसुद्धा त्यांना लोढाच सापडला. म्हणजे बिल्डरच्या हातात तुम्ही मुंबई देताय? पालकमंत्री म्हणून मग दुसरा कुणी पालकच नाही का मुंबईला?

मंत्री म्हणून लोढा यांच ऑफिस मुंबई महापालिकेत ठेवताय, मग महापौरांचं दालन तुम्ही मंत्रालयात ठेवणार आहात का? महापौर मुंबईचा आहे. मंत्रालय मुंबईत आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मग त्या मुंबईच्या महापौराचं दालन तुम्ही मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या बाजुला ठेवणार आहात का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT