महाराष्ट्र बातम्या

रामराजेंनी शिवसेनाप्रवेशावर केले वक्तव्य, म्हणाले...(व्हिडिओ)

वृत्तसंस्था

पुणे : आज मी तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. उद्या काय होईल उद्याच उद्या पाहू, अशा शब्दांत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनाप्रवेशाच्या शक्यतांना पूर्णविराम दिला. तसेच या वयात शरद पवारांची साथ सोडावी, असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तसेच यापूर्वीपासूनच रामराजे नाईक-निंबाळकर हेदेखील राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

त्यानंतर यावर बोलताना रामराजे म्हणाले, मी आज राष्ट्रवादीतच आहे. उद्याचे उद्या पाहू. या वयात शरद पवारांची साथ सोडावी असे वाटत नाही. मी कार्यकर्ता मेळावा बोलावला आहे तो पक्षातून बाहेर पडण्यासाठी नाही तर कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी बोलवला आहे. कार्यकर्ते कदाचित असाही निर्णय घेऊ शकतात की आपण आहोत तिथेच राहू.

स्वार्थासाठी निर्णय नाही

अपक्ष लढण्याबाबत कार्यकर्तेच ठरवू शकतात की आपण अपक्ष लढू. स्वार्थासाठी कोणताही निर्णय घेणार नाही. मात्र, कार्यकर्ते ठरवतील त्या दिशेने जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणेकरांनो, इंधन तुटवडा नाही, गर्दी करू नका! पेट्रोल डीलर्स असोसिएशनचं आवाहन; राज्य सरकारनेही खरेदीबाबत दिले मोठे अपडेट

Railway News: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! रेल्वे ट्रॅकखाली १२ तासांत सबवे उभारणार; ग्रामीण भागासाठी ‘गेमचेंजर’ योजना

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

SCROLL FOR NEXT