महाराष्ट्र

विधान परिषद : भाजप-मविआला धक्का; रामराजे अन् खापरेंचं मत बाद

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान पूर्ण झाले असून दोन तासांच्या खोळंब्यानंतर अखेर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मात्र, मतमोजणीदरम्यान मविआ आणि भाजपला धक्का बसला आहे. कारण, भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाद ठरवण्यात आले आहे. तर भाजपच्या उमा खापरे यांच्या कोट्आतील एक मत बाद करण्यात आले आहे. त्यामुळे भाजप आणि मविआला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या एका मतावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर मविआकडून उमा खापरे यांच्या कोट्यातील एका मतावर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, आता ही दोन्ही मतं बाद करण्यात आली आहे. (Vidhan Parishad Election Result News)

या सर्वामध्ये राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत भाजपकडून खोट्या बातम्या पेरायला सुरुवात. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोट्यातील मत बाद झाल्याची बातमी खोटी. भाजपकडून संभ्रम निर्माण करायला सुरुवात असे म्हणत मिटकरी यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

विधानपरिषदेच्या मतमोजणीमध्ये आता दोन्ही बाजूंना धक्का बसला असून राष्ट्रवादीच्या रामराजेंच्या कोट्यातील एक मत तर भाजपच्या उमा खापरेंच्या कोट्यातील एक मत बाद करण्यात आलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक एक मत बाद ठरवण्यात आल्यानंतर विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी आता उमेदवाराला 25.71 चा नवा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी भाजप दाद मागणार

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपच्या उमा खापरे यांच्या कोट्यातील एक एक मत बाद करण्यात आली आहेत. त्यामुळे या निर्णया विरोधात राष्ट्रवादी आणि भाजप केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे यावेळीदेखील राज्यसभेच्या मतमोजणीवेळी ज्या पद्धतीने विलंब झाला होता. त्याप्रमाणे यावेळीही विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT