Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

रश्मी ठाकरेंची चौकशी होणार? अलिबागमधील 19 बंगला घोटाळ्याप्रकरणी फडणवीसांनी दिली मोठी अपडेट

Sandip Kapde

Devendra Fadnavis :  : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी चौफेर वाढत आहेत. एकीकडे पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे नेते, आमदार, खासदार त्यांना सोडून शिंदे गटात सामील होताना दिसत आहेत. सध्या उद्धव ठाकरेंवर आणखी एक संकट कोसळलं आहे.

आता अलिबागमध्ये असलेल्या 19 बेकायदा बंगल्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर अलिबागच्या जंगलात 19 बंगले बांधल्याचा आरोप केला होता. याबाबत त्यांनी संबंधित विभागात तक्रारही केली होती.

दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणावर भाष्य केले आहे. फडणवीस म्हणाले, याबाबत तक्रार दाखल झालेली आहे. आता लवकरच चार्जशीट तयार होईल.

रश्मी ठाकरेंची चौकशी का नाही?

मालमत्ता रश्मी ठाकरे यांच्या नावावर आहे. चौकशी सुरू आहे. तर रश्मी ठाकरे यांची चौकशी का होत नाही, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले, आवश्यकता नाही. तसेच चौकशी कुणाची करावी आणि कुणाची नाही हे सरकार ठरवत नाही. हे पोलीस ठरवतात.

सरकार त्यात हस्तक्षेप करत नाही जसे उद्धव ठाकरे करत होते. आम्ही हस्तक्षेप केला तर सिस्टीम नीट चालणार नाही. पोलिसांना ज्याची चौकशी करायची आहे पोलीस करतली. मी एवढेच सांगतो जो चुकीचा असेल त्याच्यावर कारवाई होणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT