Refinery Survey 
महाराष्ट्र बातम्या

Refinery Survey : 'जीव गेला तरी इथेच थांबेन',...रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा का आहे विरोध?

आंदोलन करणाऱ्या २५ महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.

धनश्री ओतारी

कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, मोठी अपडेट समोर आली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलन करणाऱ्या २५ महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या महिलांवर सौम्य लाठीचार्ज केला.

मात्र, आंदोलनकर्ते आपल्या मतावर ठाम आहेत. राजापूरमधील महिलेने 'जीव गेला तरी इथेच थांबेन' असा इशारा दिला आहे. कोकणात राजापूर बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग करणारी 'रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग' प्रस्तावित आहे. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे.

कोकणातील प्रस्तावित रिफायनरीला हद्दपार करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू सोलगाव येथे हजारो स्थानिकांचे आंदोलन सुरु आहे. या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांनी विरोध करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. पण जीव गेला तरी इथेच थांबेन. अशी स्थानिक महिलांची भूमिका आहे.

तर रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा का आहे विरोध?

या प्रकल्पामुळे विकत घेतलेल्या जमिनी धोक्यात येतील तसेच मासेमारी, सागरी जैवविविधतेवर परिणाम होण्याची भीती रहिवाशांना आहे. रिफायनरीमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागांवरही परिणाम होईल असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प, एन्रॉन प्रकल्पांना झालेल्या विरोधानंतर राजापूर रिफायनरी प्रकल्पालाही बंद करा अशी मागणी आंदोलक करत आहेत.

कोकण निसर्गसौंदर्याने नटलेले असून आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा टिकाव्यात ही स्थानिकांची भूमिका आहे. याशिवाय येथील रहिवाशांचा रोजगार मासेमारी हा असल्याने या तेलशुद्धीकरणाच्या प्रकल्पांमुळे समुद्रात गरम पाणी तसेच आणखी काही घटकांच्या विसर्गामुळे मासे मरतील व जैवविविधतेवर धोका निर्माण होऊन त्याचा रोजगारावर परिणाम होईल. यामुळे ऊर्जा, पेट्रोलियम, तेलशुद्धीकरणाच्या प्रकल्पांना स्थानिक विरोध करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT