ajit pawar poliical news  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: अजित पवारांना जाहीर पाठिंबा देणाऱ्या अण्णा बनसोडेंची प्रतिक्रिया, म्हणाले 'आम्ही, अजितदादा...'

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अजित पवार केंद्रबिंदू ठरत आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अजित पवार केंद्रबिंदू ठरत आहेत. ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या वारंवार चर्चा होत आहेत आणि अजित पवार त्यावर वारंवार खुलासा देखील करत आहेत. सोमवारीही त्यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची चर्चा होती. तसंच आज आमदारांची बैठक बोलावल्याचीही जोरदार चर्चा होत आहे.

अशातच राष्ट्रवादीचे अनेक आमदार मुंबईकडे निघाल्याची माहिती आहे. प्रत्येकजण आपल्या खाजगी कामासाठी निघाल्याचं सांगत आहेत. तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिवसेना नेते त्यांच्या भाजप प्रवेशावर वक्तव्य करून अजित पवारांच्या चर्चेला हवा देत आहेत.

दरम्यान द न्यू इंडियन एक्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांपैकी ४० आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. याबाबत ते राज्यपालांना यादी देणार असल्याची चर्चा आहे. तर याबाबत बोलताना पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तर बोलताना म्हणाले की, सही बद्दल मला माहीत नाही. मी रात्री मुंबईत आलो आहे. मी अजित पवार यांना भेटणार आहे. त्यांनी बैठक बोलावली नाही तर आम्ही त्यांना भेटणार आहे. राष्ट्रवादीचे बरेच आमदार मुंबईत आले आहेत. त्यांची नाव सांगणं योग्य नाही. दादा जो निर्णय घेण्यात येईल तो आम्हाला मान्य आहे. राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांपैकी ४० आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत, आम्ही त्यांना भेटणार आहे असंही ते म्हणाले आहेत.

कोकाटे, बनसोडे यांचा जाहीर पाठिंबा

अजित पवार यांनी कोणताही निर्णय घेतला तरीही आम्ही त्यांच्या सोबत जाणार आहोत, अशी भूमिका सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे व पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सोमवारी मांडली. अजित पवार पक्षाबाहेर गेले तर त्यांच्यासोबत कोण कोण असेल, याची चाचपणी पक्षनेतृत्वाकडून गेले दोन दिवस करण्यात येत आहे. शरद पवार यांचे पुण्यातील निकटवर्तीय अनेकांना दूरध्वनी करून याबाबत विचारणा करीत आहेत. त्यात आता कोकाटे व बनसोडे यांनी जाहीर भूमिका घेतल्याने यादीत आणखी कुणाची भर पडणार याबद्दल औत्सुक्य आहे.

अजित पवारांनी साधला ४० आमदारांशी संपर्क, राज्यपालांकडे देणार यादी?

द न्यू इंडियन एक्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांपैकी ४० आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. याबाबत ते राज्यपालांना यादी देणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीबद्दलच्या अटकळी गेल्या आठवड्यापासून जोरात सुरू आहेत. अजित पवार यांनी नियोजित बैठका रद्द केल्या आणि भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल देखील मवाळ भूमिका घेतली. त्यामुळे अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

योग्यवेळी आल्यावर ४० आमदारांची यादी अजित पवार राज्यपालांकडे देणार असल्याचे वृत्त देखील समोर आले आहे. अजित पवार यांनी वयैक्तिक रीत्या ४० आमदारांना संपर्क साधला आहे. या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावरील निर्यण काही दिवसांवार येऊन ठेपला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आधी अजित पवार यांनी शपथ घेतल्यास सरकार पडणार नाही, असे देखील वृत्तात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT