Read story to apply online application job festival for unemployed
Read story to apply online application job festival for unemployed 
महाराष्ट्र

बेरोजगारांसाठी ऑनलाइन नोकरी महोत्सव; अर्ज कोठे करायचा ते वाचा

अशोक मुरुमकर

सोलापूर : कोरोना व्हायरसमुळे अनेक परप्रांतीय कामगार आपापल्या गावी गेले आहेत. त्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावर होत आहे. मन्युष्यबळ उपलब्ध होत नसल्याने उद्योगधंदे सुरु करण्यास अडचणी येत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मनुष्यबळ तयार व्हावे, म्हणून राष्ट्रवादीकडून इच्छुकांसाठी ‘ऑनलइन नोकरी महोत्सव’ होणार आहे. याची पोस्ट फेसबुकवर करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी महाराष्ट्रात मार्चपासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अनेक उद्योग धंदे बंद पडले. आता लॉकडाऊनमध्ये उद्योगांना सवलत दिले आहे. मात्र, अनेक कामगार गावी गेले आहेत. उद्योग पुर्ण क्षमतेने सुरु करण्यास अडचणी येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा १० जूनला वर्धापनदिन आहे. यानिमित्त 'ऑनलाईन नोकरी महोत्सवाचे' होणार आहे. या महोत्सवाअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार युवक- युवतींना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाल्यामुळे औद्योगिक कंपन्यांनाही मनुष्यबळाची आवश्यकता आहे. कष्ट करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम देण्याच्या हेतूने हा ऑनलाईन नोकरी महोत्सव होत आहे. राज्यातील गरजू बेरोजगार युवक-युवतींनी या उपलब्ध होणाऱ्या रोजगार संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. इच्छुकांना नाव नोंदणीसाठी https://forms.gle/xikubng6MBGTpPgp8 या लिंकवर माहिती देण्याचे आवाहन केले आहे. फेसबुकवर माहिती देणारी ही पोस्ट राष्ट्रवादीच्या वॉलवरुन १६ जणांनी शेअर केली आहे यावर काही प्रतिक्रीयाही आल्या आहेत. 

राष्ट्रवादीच्या पोस्टवर आलेल्या प्रतिक्रीया...
राष्ट्रवादीने वर्धापनदिनानिमित्त होणाऱ्या ऑनलाइन नोकरी महोत्त्सवाची माहिती देणारी पोस्ट केली आहे. यावर प्रीती नवलकर यांनी म्हटले की, ‘आम्ही १५ वर्ष काम करुन ही आम्हाला काढलं. आमचा प्रश्‍न सोडवा.’ बबन राऊत यांनी म्हटलं की, ‘अती उत्तम, गती द्या, बेकारी हटवा, मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करा.’संतोष पोखरकर यांनी म्हटलं की, मला नोकरीची गरज आहे. मला २० वर्षाचा अनुभव आहे.
नोकऱ्या गेल्याने संताप
कोरोना व्हायरसमुळे राज्यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कोरोनामुळे उद्योगांवर परिणाम झाला असल्याने काही ठिकाणी कामगार कपातीमुळे काहींच्या रोजगारांवर परिणाम झाला आहे. असे असताना काही ठिकाणी लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूर व पुणे, मुंबई सारख्या शहराकडे कामाधंद्याच्यानिमित्ताने गेलेले मजुर आपल्या मुळ गावी गेले आहेत. कोरोनाच्या भितीने ते कामावर येत नसल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम उद्योगधंदे सुरु करण्यावर होत आहे. कोरोनामुळे नोकरी गेल्याने अनेकजण संताप व्यक्त करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT